क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वरमध्ये गुंडगिरीचा उच्छाद – पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवर जातीय द्वेषातून अमानुष हल्ला – अनुसूचित जाती-जमाती ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल.

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

महाबळेश्वरमध्ये गुंडगिरीचा उच्छाद – पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवर जातीय द्वेषातून अमानुष हल्ला – अनुसूचित जाती-जमाती ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल.

महाबळेश्वर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेची अक्षरशः चिरफाड करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ईरटिगा वाहनाचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बातमी संकलनासाठी गेलेल्या पत्रकारावर दहा ते पंधरा डंपरचे चालक व मालक मिळून सुमारे २० ते २५ जणांच्या गुंड प्रवृत्तीच्या टोळीने संघटितपणे हल्ला केला.


अपघाताची माहिती देण्याऐवजी या टोळीने दहशत माजवत “तू पत्रकार आहेस” आणि “तू महार समाजाचा आहेस” या कारणावरून जातीय द्वेषातून पत्रकाराचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. याचवेळी सामाजिक कार्यकर्ते व लोकसेवक यांना लक्ष्य करून जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार म्हणजे सरळसरळ संविधान, सामाजिक न्याय आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला गुंड हल्ला आहे.
वाई व फलटण येथील संबंधित डंपर चालक व मालकांनी मिळून केलेली ही गुंडगिरी कोणत्याही सभ्य समाजाला मान्य होणारी नाही. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, पत्रकारावर हल्ला, मारहाण, धमकी, जबरी चोरी व जमावाने दहशत निर्माण केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गुंड टोळीवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा उद्या कुठलाही पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता किंवा सामान्य नागरिक सुरक्षित राहणार नाही. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला असून दोषींना कायद्याचा धडा शिकवला जाईल, अशी अपेक्षा आहे.
गुंडगिरी, जातीय द्वेष आणि पत्रकारांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. दोषींना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार संघटना व सामाजिक संघटनांनी दिला आहे.

स्वतःउत्तम यदुनाथ भालेराव वय. 51 वर्षे, व्यवसाय-शेती /पत्रकार RPS स्टार, जात-महार रा. भिमनगर तळदेव ता. महाबळेश्वर जि. सातारा,मो नं- 9404294342 समक्ष पोलीस ठाणेत हजर राहुन देतो खबरी जबाब की, मी वरील प्रमाणे असून वरील ठिकाणी माझे कुटुंबासह राहतो व वरील प्रमाणे काम करतो मी पत्रकार म्हणून 5 वर्षांपासुन काम करीत आहे तसेच वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष म्हणून काम करीत आहे. आज दि. 04/01/2026 रोजी 10.30 वा. चे. सुमारास माझे राहते घरून माझ्या चार चाकी गाडीने महाबळेश्वर येथे कामानिमित्त येत असताना चिखली फाटा येथे एका डंपर ने एका इर्टीगा गाडीला धडक दिली होती तेथे बरीच लोक जमलेली होती त्यामुळे मी तेथे काय प्रकार घडला आहे हे पाहण्यासाठी थांबलो असता अपघात मोठा असल्याचे दिसल्याने मी सदर ठिकाण ची माझे OPPOया कंपनीचे मोबाईल मध्ये शुटींग करू लागलो. सदर अपघात घडले ठिकाणी रस्त्याचे एका बाजूला महाबळेश्वर कडे येणारे 10 ते 12 डंपर रस्त्यावर एका मागोमाग एक थांबले होते सदर अपघात झाल्याने डंपर मधील ड्रायवर व त्यांचे मालक एकत्र जमून रस्त्यावर थांबले होते. मी माझे मोबाईल मध्ये व्हिडीओ काढत असताना एक गुलाबी व पांढ-या रंगाचा टी. शर्ट व त्यावर राखाडी रंगाचा स्वेटर घातलेला, चश्मा असलेला व दाढी असलेल्या इसमाने तू कोण आहेस व व्हिडीओ का काढत आहेस असे म्हणाला असता मी त्याला पत्रकार असल्याचे सांगितले तेव्हा त्याने तुझे आयकार्ड दाखव असे म्हणून माझा मोबाईल घेतला मला खाली पाडून लाथा बुक्यांनी मारहाण केली व माझा मोबाईल मला परत दिला त्यानंतर 1) एक पांढ-या रंगाचा शर्ट घातलेला व गळ्यात पिवळ्या रंगाची चैन घातलेला इसम, 2) तसेच हिरव्या रंगाचा टि. शर्ट घातलेला रंग काळा असलेला इसम, 3) पिवळसर रंगाचा टी. शर्ट घातलेला दाढी असलेला कपाळावर नाम ओढलेला व खांद्यावर भगव्या रंगाचे कापड असलेला इसम4) जांभळ्या रंगाचा फूल बाह्याचा टी. शर्ट घातलेला इसम यांनी माझ्या शर्टच्या खिशाला लावलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पेन पाहून त्यांनी हा महारड्या आहे याला जीवे मारा असे म्हणून त्यांनी मला खाली पाडून लाथा बुक्यांनी माझ्या संपूर्ण शरीरावर मारहाण केली तेव्हा तेथे असलेले डंपर क्र. 1)MH-11DV-8447,2)MH-11-DT-7137,3) MH-53-0480, 4)MH-53-80109, 5)MH-11-DD-5895, 6)MH11-DT-4723,7)MH-11-DD-8913,8) MH-11-CU-1900,9)MH-01-DR-7071,10)MH-11-DS-3376, व इतर डंपर चे चालकांनी देखील मला लाथा बुक्यांनी मारहाण केली. सदर घटनेवेळी तेथे 1) नामे संतोष आप्पा जाधव (जि. उपाध्यक्ष शिवसेना गट) रा. चिखली ता. महाबळेश्वर जि. सातारा 2) गणेश उत्तेकर (शिंदे गट तालुका प्रमुख) रा. वानवली ता. महाबळेश्वर जि. सातारा अजून काही लोक हजर होते व त्यांनीच मला तेथून सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथे पोलीस आले व मी तक्रार देणे करीता पोलीस ठाणे महाबळेश्वर येथे आलो.
तरी आज दि.04/01/2026 रोजी मौजे चिखली फाटा येथे सकाळी 10.30 वा. चे. सुमारास डंपर व इर्टीगा गाडीचा अपघात झाल्याचे मला दिसल्याने व मी पत्रकार असल्याने मी माझ्या मोबाईल मध्ये अपघात झालेल्या ठिकाणाचा व्हिडीओ करीत असताना 1) एक पांढ-या रंगाचा शर्ट घातलेला व गळ्यात पिवळ्या रंगाची चैन घातलेला इसम, 2) तसेच हिरव्या रंगाचा टि. शर्ट घातलेला रंग काळा असलेला इसम, 3) पिवळसर रंगाचा टी. शर्ट घातलेला दाढी असलेला कपाळावर नाम ओढलेला व खांद्यावर भगव्या रंगाचे कापड असलेला इसम4) जांभळ्या रंगाचा फूल बाह्याचा टी. शर्ट घातलेला इसम यांनी माझ्या शर्टच्या खिशाला लावलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोर्टा असलेला पेन पाहून त्यांनी हा महारड्या आहे याला जीवे मारा असे म्हणून मला जातीवाचक शिवीगाळ करून खाली पाडून लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे. असा कसा समाजकंटकांवरती कडक कारवाई करण्यात यावी.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button