कणकवली:-माड तोडत असताना तो मधोमध तुटून अंगावर पडल्याने कल्पेश दत्तात्रय नाडकर्णी (वय ३५, रा. तोंडवली या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कणकवली:-माड तोडत असताना तो मधोमध तुटून अंगावर पडल्याने कल्पेश दत्तात्रय नाडकर्णी (वय ३५, रा. तोंडवली या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू.
ही घटना तोंडवली येथेच गुरुवारी सायंकाळी ६.३० वा. सुमारास घडली. कल्पेश हा आपले चुलते पद्माकर नाडकर्णी यांच्यासमवेत एका शेजाऱ्याचा सुकलेला माड कटर मशीन व दोरीच्या सहाय्याने तोडत होते. माड तोडत असतानाच अचानक मधोमध तुटला व तो थेट कल्पेश याच्या डोक्यावर पडला. यामध्ये कल्पेश याच्या डोक्याला, उजव्या दंडाला गंभीर दुखापत झाली.
कल्पेश याला सुरुवातीला कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी त्याला गोवा – बांबोळी येथे नेले जात होते. पण वाटेत, रात्री ९.३० वा. सुमारास कल्पेश याच्या शरीराची हालचाल होईनाशी झाली. त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता कल्पेश याचा मृत्यू झाला होता. याबाबत पद्माकर यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.




