कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सिल्लोड:-अधिकारी व ठेकेदारांचे संगनमत – महिनाभरापूर्वी तयार झालेला डांबरी रस्ता उखडला.

पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर:-9834313401

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर

अधिकारी व ठेकेदारांचे संगनमत – महिनाभरापूर्वी तयार झालेला डांबरी रस्ता उखडला.
जळकीबाजारला जाणाऱ्या ग्रामस्थांची अडचण; कोटी रुपयांचा चुना.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पहिल्यांदाच सिल्लोड तालुक्यातील टोकावरच्या गावास जोडणाऱ्या जळकीबाजार रस्त्याचे भाग्य २०१० साली उजाळले होते
तेरा वर्षांनंतर या रस्त्याची जून २०२३ मध्ये तब्बल एक कोटी वर रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या निधीतून डांबरीकरण पूर्ण झाले आहे.महिना उलटत नाही तेच हा रस्ता तब्बल बारा ठिकाणी उखडला आहे.पावसाळा संपे पर्यंत या रस्त्याची वाताहत होणार असल्याने खुपटा व जळकीबाजार येथील ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे.
सिल्लोड तालुक्यातील आदिवासी लोकवस्ती असलेले जळकीबाजार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामुळे प्रकाश झोतात आले आहे.खराब रस्त्यामुळे येथील ग्रामस्थांनी तब्बल दहा वर्षे यातना भोगल्या.आधी
पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत खुपटा ते जळकीबा जार रस्त्यावर ५.५० किमी साठी ८४.७५ लक्ष रुपये खर्च झाले.आता पुन्हा याच रस्त्यावर जवळपास १ कोटी २७ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे.एवढा निधी उपल ब्ध असताना महिनाभरात रस्ता उखडलाच कसा असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.विशेष दोन्ही साईट पंखे हे काळ्या मातीने भरल्यामुळे दोन मोठी वाहने जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसलाही चालक मोठ्या जोखमीने घेऊन जातात.
………….
नियम डावलून काम…
विहिरीवरचा दगड,जुन्या रस्त्याचे खोदकाम न करता खडी करण,डांबराचा अत्यल्प वापर,जिल्हा परिषदेच्या सा.बा. विभागांच्या अधिकाऱ्यांचे व ठेकेदारांचे संगणमत
अंदाज पत्रक गुंडाळून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
महिनाभरातच शासनाचे तब्बल सव्वा कोटी पाण्यात गेले आहे.आम्ही काम अडवण्याचा प्रयत्न केला व ठेकेदाराने न जुमानता काम सुरूच ठेवले.
संदीप काळे रहिवासी खुपटा.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button