वाई:-ग्रामपंचायत वयगावचा सुजल संवाद कार्यक्रम ठरला मार्गदर्शक.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

📰 ग्रामपंचायत वयगावचा सुजल संवाद कार्यक्रम ठरला मार्गदर्शक.

मोजे वयगाव (ता. वाई, जि. सातारा) येथे जल जीवन मिशनच्या मार्गदर्शनाखाली सुजल ग्रामसंवाद कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थेबाबत समुदाय सहभाग वाढविणे, हर घर जल योजनेअंतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेणे आणि सेवा वितरण अधिक प्रभावी बनविणे हे या संवादाचे प्रमुख उद्दिष्ट होते.
देशभरातील निवडक गावांमधून सादरीकरणासाठी वयगावची निवड झाल्याने गावाचा सन्मान झाला आहे. गावातील पाणीपुरवठा, नळजोडणी, वितरणव्यवस्था व जलव्यवस्थापनाबाबतची प्रगती राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाली.
सदर कार्यक्रम उपकार्यकारी अधिकारी प्रज्ञा भोसले मॅडम आणि माननीय गटविकास अधिकारी सो. विजयकुमार परीट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, जलसुरक्षक आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन रचनात्मक संवाद साधला.
कार्यक्रमास रूपाली परीट मॅडम, पाणीपुरवठा विभागातील शुभांगी शेलार मॅडम, स्वच्छ भारत मिशनच्या स्वाती जाधव मॅडम, तसेच सारिका गवते मॅडम या मान्यवरांनी उपस्थित राहून महत्वाचे मार्गदर्शन केले.
संवादादरम्यान हर घर नळजोडणीची सद्यस्थिती, पाणी वितरण व्यवस्था, जलस्रोत संवर्धनाची गरज आणि पुढील नियोजन यावर सखोल चर्चा झाली. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पदाधिकाऱ्यांचे समन्वित कार्य यामुळे हा सुजल संवाद कार्यक्रम ग्रामपंचायत वयगावासाठी मार्गदर्शक, उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला.




