आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:-जरूळ येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी बाबासाहेब जाधव वैजापूर:-9665566273

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
जरूळ येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
वैजापूर तालुक्यातील जरूळ येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.त्यानंतर शिव आरती झाली व फटाकेच्या आतिषबाजी शिवगर्जनाने परिसर दुमदुमून गेला.
त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय जरूळ येथे शिवशंभु विचारमंच समिती तर्फे शिवजयंती निमित्त स्पर्धापरीक्षा आयोजन करण्यात आले होते. त्याचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जरूळ गावातील शासकीय निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग व गावातील सर्व पदाधिकारीसह मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थिती होती.