श्रीरामपूर :-परमपूज्य श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांना पैठण येथे महाभागवत उपाधी प्रदान ….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
परमपूज्य श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांना पैठण येथे महाभागवत उपाधी प्रदान ….
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जमार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना पैठण येथे आयोजित सोहळ्या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते महाभागवत ही विशेष उपाधी प्रदान करण्यात आली
शांतिब्राह्म सेतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज समाधी चतु : शतकोत्तर रोप्य महोत्सव तथा ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवत जयंती सुवर्ण महोत्सव निमित्त श्री क्षेत्र पैठण येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्या प्रसंगी जगदगुरू जनाईन स्वामी महाराज धर्म पिठाचे पिठाधिश्वर अधात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना ‘ महाभागवत ‘ ही विशेष उपाधी प्रदान करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत . शां तिब्रम्ह एकनाथ ह भ प श्री योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या हस्ते श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरजी महाराजांना ‘ महाभागवत . ही विशेष उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी गहिनीनाथ औसेकर गुरुबाबा औसेकर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे . केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड . पालकमंत्री संदीपान भुमरे . मंत्री अतुल सावे . आमदार हरिभाऊ बागडे यांसह मान्यवर उपस्थित होते यावेळी शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे वंशड योगीराज महाराज यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथाचे आभ्यासक व या ग्रंथाला प्राण मानणाऱ्या राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज व उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांगगिरीजी महाराज यांच्या कार्या बदल विशेष शब्दात गौरव केला