आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहता:-शां.ज.पाटणी विद्यालयाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश सार्थक धुमाळ राज्यात बारावा व जिल्ह्यात सहावा.

प्रतिनिधी बाबासाहेब अंत्रे राहता:-9890557798

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

शां.ज.पाटणी विद्यालयाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश
सार्थक धुमाळ राज्यात बारावा व जिल्ह्यात सहावा.

राहाता :-महाराष्ट्र राज्य परीक्षेत परिषद पुणे आयोजित पूर्व माध्यामिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकालात हिंद सेवा मंडळाच्या शां.ज. पाटणी विद्यालयाचा विद्यार्थी चि सार्थक धुमाळ राज्यात बारावा आणि जिल्ह्यात सहावा आला,आशुतोष मुळे राज्यात तेरावा जिल्ह्यात सातवा, अथर्व बर्डे जिल्ह्यात तेहतीसावा, प्रणव मंडलिक जिल्ह्यात ऐंशीवा व अथर्व लोहकरे जिल्ह्यात नव्वदवा क्रमांकाने नेत्रदीपक यश संपादन केले.
जनसेवा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठाण,अहमदनगर संचालित डॉ.सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक परीक्षा २०२२ चा निकाल नुकताच जाहीर झाला त्यात इ. ९ वी चा विद्यार्थी अथर्व बर्डे तालुक्यात प्रथम,इ. १०वी चा विद्यार्थी बालाजी बोर्डे तालुक्यात प्रथम आला इ. ९ वी चे विद्यार्थी सार्थक धुमाळ व आशुतोष मुळे यांनी जिल्ह्यात अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक मिळवला .
या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाचे चेअरमन भरत कुंकूलोळ, सुशिल रांका, निपून चोरडिया,विनित कुंकूलोळ व विदयालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल भांगरे आदिंनी केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे हिंद सेवा मंडळाचे उपाध्यक्ष बापुसाहेब जौक, मानद सचिव संजय जोशी,चेअरमन भरत कुंकूलोळ,मुख्याध्यापक विठ्ठल भांगरे,पर्यवेक्षिका मंगला डोळस व शिक्षक वृदांनी अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक नितीन यशवंत,किरणकुमार पुंड,ज्ञानेश्वर लकडे,कैलास जेजुरकर, रश्मी कासार,अनुप्रिती पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button