सिल्लोड :-डेंग्यू आजाराने चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्य.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद :-9834313401

डेंग्यू आजाराने चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्य.
सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे डेंग्यू आजाराने चार वर्षीय चिमुकल्याचा जीव घेतला आहे. साबीर खान करीम खान या चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार ( दि.०६ ) रोजी सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.
साबीर खान करीम खान असे मृत मुलाचे नाव असून,तो अनेक दिवसापासून तापेने फणफणत होता. त्याला डेंग्यू सदृश तापेची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळी पूर्व नियोजन न केल्यामुळे गावात पसरलेल्या दुर्ग॔ध, तसेच नाल्यांची साफसफाई होत नाही. अनेक ठिकाणी सांडपाण्याचे डपके तयार झाले आहेत. सध्या परिसरात तापेच्या आजाराने डोके वर काढले असून,सर्दी,खोकला व गळा दुखीचे रुग्ण अधिक आहे. शासकीय दवाखान्यात उपचार मिळत नसल्याने, रुग्णांना खाजगी दवाखान्यात भरती केले जात आहे. डेंग्यूच्या तापेचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. साबीरची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी उपचारादरम्यान त्याची सकाळच्या सुमारास प्राणज्योत मावळली.