ताज्या घडामोडीदेश विदेश
Mansoon 2022: आज केरळमध्ये मान्सूनचे होणार जोरदार आगमन; भारतीय हवामान विभागाचा अंदाज.
संपादक:- प्रल्हाद चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष

Mansoon 2022 :- देशातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच सामान्य जनता मान्सूनची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.पूर्व मशागतीसाठी (Pre Cultivation) लगबग करत असलेला बळीराजा आणि उकाड्यापासून हैराण झालेली जनता मान्सूनच्या प्रवासावर मोठे बारीक लक्ष धरून आहेत. आता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितल्याप्रमाणे, दरवर्षीच्या तुलनेने या वर्षी मान्सूनचा प्रवास हा चांगला सुयोग्य असून भारतात मान्सून आता मोठ्या थाटात दाखल झाला आहे.हवामान विभागानुसार, मध्यंतरी आलेल्या असनी चक्रीवादळामुळे मान्सून साठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे मान्सून (Mansoon Arrive In Keral) वेळेआधीच यंदा भारतात दाखल होणार असल्याचे वर्तवले गेले आहे.