आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-छत्रपती शिवाजी महाराज आपले ऊर्जास्त्रोत : गोविंद भुजबळ.

प्रतिनिधी आशितोष चव्हाण :-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी आशितोष चव्हाण

छत्रपती शिवाजी महाराज आपले ऊर्जास्त्रोत : गोविंद भुजबळ.

फलटण :
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जाती व बारा बलुतेदार यांना बरोबर घेत स्वराज्याची स्थापना केली .महाराजांनी स्वराज्य स्थापनेत कधीच जातीय भूमिका घेतली नाही त्यांच्या बरोबर असणारे सरदार आणि मावळे त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर स्वराज्याच्या स्थापनेत महाराजांच्या बरोबर होते . यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आजही आपल्या सर्वांसाठी आद्यप्रेरणा आहेत असे मत सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ यांनी संत सावतामाळी मंदिर येथे महात्मा फुले जयंती उत्सव समिती तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना मांडले
यावेळी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व जय शिवाजी जय भवानी च्या घोषणा देत महाराजांना अभिवादन करण्यात आले या वेळी सरपंच मुनीष जाधव , मनसेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे , बाळासाहेब अडसूळ , किरण राऊत आनंद काळूखे , नाना नाळे , अर्जुन शेंडे , प्रा विशाल शिंदे ,संदीप नेवसे, बिनु शिंदे , दिपक शिंदे , प्रताप शिंदे, गणेश अडसूळ ,ऋषिकेश शिंदे, राहुल शिंदे ,प्रा जि एम जाधव
दत्ता नाळे यासह बहुसंख्य शिवप्रेमी व नागरिक उपस्थित होते
या नंतर सर्व समिती सदस्य व शिवप्रेमी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी चौक येथे जाऊन महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button