वाई:-मा. आमदार मकरंद आबा पाटील यांच्या मातोश्री व स्वर्गीय मा.लक्ष्मणतात्या पाटील यांचे संस्कार प्रेरणादायी.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मा. आमदार मकरंद आबा पाटील यांच्या मातोश्री व स्वर्गीय मा.लक्ष्मणतात्या पाटील यांचे संस्कार प्रेरणादायी.
आत्मनिर्भर, कृतीशील कुटुंब वारसा लाभलेले आबा गेली सतरा वर्ष वाई खंडाळा, महाबळेश्वर या तीन तालुक्याचे नेतृत्व समर्थपणे करीत आहेत. या तिन्ही तालुक्याचे प्रश्न तत्परतेने सोडवून विकासाकडे वाटचाल करताना आबा दिवस- रात्रीचाही विचार करत नाहीत. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता हे नेतृत्त्व फक्त आणि फक्त माणसातला माणूस म्हणून या तिनही तालुक्यातील लोकांच्या हृदयातील श्रद्धास्थान बनलेल आहे. छत्रपती शिवरायांच स्वराज्य प्रेम, महात्मा फुल्यांना वाटणारा मानवतेचा कळवळा याचा प्रत्यय मा. आबांच्या व्यक्तीमत्वातून सदोदित दिसून येतो.लोककल्याणाची तळमळ हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे मुख्य अधिष्ठान आहे.लोककल्याणाची तळमळ असल्यामुळेच D.C.C बँकेचे संचालक, किसनवीर सहकारी कारखान्याचे चेअरमन आणि तीन तालुक्याचे आमदार म्हणून काम करत असताना लोकांचे त्यांच्यावर असणारे प्रेम त्यांना उर्जा देते. आणि या उर्जेतूनच रोजच्या दिवसाची सुरुवात आबांसाठी अधिक प्रेरणादायी असते. या आबांच्या उर्जेचा कळस मतदारसंघाने पाहिला, अनुभवला तो कोरोनाच्या काळात, संपूर्ण जग कोविडच्या विळख्यात सापडले असताना आबा मतदारसंघात फिरत होते. तळागाळातल्या जनतेला किराणा सामानाची किट, गरीबांना दोन वेळचा जेवणाचा डबा मिळेल याची व्यवस्था करत होते. ‘मॅप्रो कोविड सेंटर, शेंदूरजने’ येथे कोविड रुग्णासाठी केलेली नियोजनबद्ध व्यवस्था कौतुकास्पद आहे. नियोजन पद्धतीने काम कसं करावं हे आबांकडून शिकण्यासारख आहे.आमच्या येथील गरीब महिलांना, गरवारे येथील गरजू कामगारांना कोविड काळात काम बंद असताना, आबांना फोन केला असता आबांनी तत्परतेने दखल घेत त्यांना घरपोच किराणाकिट पोहोचवण्याची व्यवस्था केली. गरीब महिलांना सरकारीद वाखान्यात मिळणारी डायबिटीस औषधे मिळत नव्हती आबांना फोन केल्यानंतर तत्परतेने त्याचीही दखल घेऊन महिलांना डायबिटीस औषधे मिळण्याची सोय केली. पुरोगामी विचार प्रत्यक्षात आणणारे ते कृतिशील सुधारक आहेत. समस्त स्त्री वर्गाबद्दल त्यांना अनन्य साधारण आदरभावना आहे. महिलांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी उदात्त आणि व्यापक आहे म्हणूनच महिला आपले प्रश्न घेऊन आबांकडे निःसंकोचपणे जातात त्यामुळेच महिलांना आमदारांपेक्षाही ‘आबा’ जवळचे वाटतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने लोकशाही स्विकारली. यात मतदान प्रक्रियेतून नेता निवडीचे आपल्याला अधिकार मिळाले तर आपण आबांसारखा समाजाला आपला वाटणारा नेता, समाजहित जपणारा नेता आपण निवडला मा.आ.मकरंद आबा आपले नेते आहेत हे आपल्या सर्वांच भाग्य आहे.ज्या कार्यकर्त्यांना पक्षाविषयी निष्ठा आहे अशी माणसे आबा जोडत आहेत. तितक्याच काळजीने ताकद देण्याचे काम करत आहेत. मित्रभाव हा त्यांच्या स्वभावाचा एक पैलू आहे. पारखून मित्र केलेल्या माणसांची जपणूक करणे ही गोष्ट समाजजोडणीसाठी महत्त्वाची आहे, म्हणूनच समाज जोडणीसाठी आबा सतत लोकांच्या संपर्कात असतात.म्हणूनच लोकांच्याकडे छोटे मोठे कार्यक्रम, सुख-दु:खाच्या गोष्टी, नैसर्गिक आपत्ती, यासारख्या प्रसंगात आबा हजेरी लावतात.म्हणूनच सामान्य कार्यकर्त्यापासून ते राज्य पातळीवरील असामान्य नेत्यापर्यंत आबांबद्दलचा आदर ओतप्रोत भरलेला दिसतो.भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ‘कर्मन्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या कृष्णाच्या वचनाप्रमाणे काम करत रहा. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपले कार्य करा हेच तत्व तीन तालुक्याचे मा.आमदार मकरंद आबा सदैव पाळत आलेले आहेत. त्यामुळे आजपर्यंत केलेले कामच या कुरुक्षेत्रावर मकरंद आबांना यशाच्या शिखरावर नेत आहे. गर्तेत गेलेला किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. आबा या कारखान्याला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि या प्रयत्नांना नक्कीच यश येणार. लोकांनी टाकलेला विश्वास आबा नक्कीच सार्थ ठरवतील यात शंका नाही. आणि हे यश सगळ्याचा कळस असणार आहे कारण शेतकरी राजाचं सुख आणि त्यांचे आर्शिवाद आबांना सगळ्या सुखांपेक्षाही परमसुख आहे.येणाऱ्या पुढील काळात मिळणाऱ्या संधीचे सोने करणारे, समाजासाठी अहोरात्र झटणारे, शासनदरबारी कामाचा प्रचंड पाठपुरावा करणारे.जनतेच्या सिंहासनावर विराजमान असणाऱ्या आबांना चांगले आरोग्य लाभून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते.दिपावलीच्या लाखो दिव्यांप्रमाणे त्यांच्या आयुष्यात सगळा मतदारसंघ उजळून निघू दे हीच त्यांच्या वाढदिनी ईश्वराजवळ प्रार्थना !!!गतिशीलतेचा अखंड धबधबा कर्तव्याचा अविरत झरा तरुणांचा खळाळता उत्साह वृद्धांचा तुम्ही दिलासा उदंड आयुष्य मिळो आपणांस याच वाढदिनी लक्ष लक्ष शुभेच्छा !!!
– निलिमा अशोक सरकाळे
( सामाजिक कार्यकर्त्या)