कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-वडूज नगरीत आनंदाने विजयानंतर पतीने केले पत्नीचे औक्षण.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

वडूज नगरीत आनंदाने विजयानंतर पतीने केले पत्नीचे औक्षण.
अजित जगताप
वडूज दि: संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. दोन्ही पॅनल प्रमुखांचे उमेदवार व अपक्षांनी प्रचार यंत्रणा राबवताना खूप मोठी काळजी घेतली होती. प्रत्येक मतदारांपर्यंत प्रचारक पोहोचले होते. परंतु , खटाव विकास आघाडीच्या महिला राखीव मतदारसंघातील सौ लता आनंद जगदाळे या विजयी झाल्या. त्यामुळे त्यांचे पती श्री आनंद जगदाळे यांनी स्वतः औक्षण करून आपल्या पत्नीचे कौतुक केले. विशेष म्हणजे ट्रॅक्टर एजन्सीचा अनुभव असलेल्या सौ जगदाळे यांचे निवडणूक चिन्ह हे सुद्धा ट्रॅक्टर होते. हा योगायोग समजला जात आहे.
खटाव तालुक्यातील वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटना तर दुसऱ्या बाजूला खटाव विकास आघाडीच्या माध्यमातून तसेच राष्ट्रीय समाज पक्ष व अपक्षांनीही आपले नशीब आजमावले होते. या मतमोजणीनंतर खटाव विकास आघाडीला १३ व विरोधकांना ५ जागा मिळाल्या.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे उच्चशिक्षित महिला उमेदवार सौ. लता जगदाळे व सौ सुनीता मगर या विक्रमी मतांनी निवडून आल्या. सौ.जगदाळे यांना सहकार क्षेत्रातील अनुभव असून महिला बचत गट व आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेले आहे. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या नामांकित कंपन्यांच्या ट्रॅक्टर विक्रीचा त्यांना अनुभव आहे. त्यांचे मूळ गाव हे पेडगाव ता. खटाव असून वेळू ता .कोरेगाव हे माहेर आहे. सासर व माहेर शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून त्यांचे पती श्री. आनंद जगदाळे हे विद्या विभूषित असून द्वि पदवीधर तसेच कायदे तज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. पेडगाव ता. खटाव येथे बागायतदार शेतकरी म्हणून ते परिचित आहे. एका कर्तबगार महिलेने विजय संपादन केल्याबद्दल त्यांचाही गुणगौरव व्हावा. या भावनेतून श्री. आनंदा जगदाळे यांनी आपल्या पत्नीचे पारंपारिक पद्धतीने औक्षण केले. या वेळेला त्यांना सौ.विद्या अनिल कोळी सौ. कल्पना शहाजी जाधव सौ सारिका आनंद घार्गे, सौ संगीता अरुण दबडे यांची मोलाची साथ लाभली तर सासू माई श्रीमती सरुबाई विठोबा जगदाळे यांचे आशीर्वाद लाभले. योगायोग म्हणजे लग्नाच्या विसाव्या वाढदिवसाच्या दिवशीच विजया निमित्त पती श्री. आनंदा जगदाळे यांनी औक्षण केल्याने पुन्हा एकदा नांदो सौख्यभरे चा आवाज घुमू लागला. सध्या सहकार क्षेत्रामध्ये महिलांची कर्तबदारी चांगलीच दिसून येत आहे. त्यामुळे शेती उत्पन्न बाजार समितीच्या ऊर्जेत अवस्थेत आणण्यासाठी चेअरमन पदाची माळ सौ. लता जगदाळे यांना द्यावी अशी मागणी सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य संचालक महिला वर्गाने केली आहे. त्याचा निश्चितच पॅनल प्रमुख माजी आमदार प्रभाकर घार्गे व दोन आमदार तसेच डॉ. येळगावकर निश्चितच करतील असा विश्वास व्यक्त होत आहे.
—————————————————————-

फोटो शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ लता जगदाळे यांचे ऑप्शन करताना पती आनंदा जगदाळे व हितचिंतक महिला वर्ग (छाया – सूरज पोतदार, वडूज)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button