सातारा:-सातारा जि. प. मधील माहिती अधिकाऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा जि.प.मधील माहिती अधिकाऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल.
सातारा दि: सातारा जिल्हा परिषदेमध्ये अनेक प्रामाणिक व होतकरू माहितीच्या अधिकाराच्या कार्यकर्त्यांनी काही बाबी उघड केल्या. परंतु, त्याची फारशी गंभीर दखल घेतली नाही. आता मात्र माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल सातारा जिल्हा परिषद प्रशासनाला घ्यावी लागलेली आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये प्रस्थापितांनी चांगले जाळे विणले असल्यामुळे विस्थापितांना त्रास देणे. त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे. असा एक कलमी कार्यक्रम काहींच्या सांगण्यावरून सुरू होता. आता कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ ठरत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नती मिळवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र सादर केले होते. बाबत कारवाई होऊ नये. म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. कंत्राटी पद्धतीने ठेकेदारी मिळवून देणे. बिल काढणे. यापुढे जाऊन आता थेट काही अधिकाऱ्यांनाच लक्ष केले जात होते. सातारा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून न्याय मागणीसाठी अनेकदा निवेदन व आंदोलन केले. आता खऱ्या अर्थाने राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या रूपाने खमक्या मंत्री लाभल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांसाठी नियमावली केली तर त्याबाबत चुकीची माहिती पसरवून दिली जात होती. दरवर्षी यात्रा व लग्नसराई निमित्त काही कर्मचारी ऑन ड्युटी हजेरी लावत होते. त्यामुळे प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये थांबून उर्वरित काम उरकून घ्यावे लागत होते. आजही असे कर्मचारी व अधिकारी प्रामाणिकपणाने काम करून जिल्हा परिषदेच्या नावलौकिक कायम ठेवत आहेत. परंतु राजकीय नेत्यांच्या आजूबाजूला फिरणारे वशिलेबाजीमुळे अनेक कर्मचारी हे अधिकाऱ्यांच्या वर डोईजड ठरत होते. आता त्याला पायबंद घालण्याची वेळ आली आहे.
दस्तूर खुद ग्रामविकास मंत्र्यांनाच दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलची आठवण करून द्यावी लागली होती. प्रस्थापित मंडळींच्या आजही सातारा जिल्हा परिषदेमध्ये वावर असल्यामुळे खऱ्या अर्थाने आता जिल्हा परिषदेची झाडाझडती सुरू झालेली आहे. त्याची सुरुवात सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झाली होती.
नेहमीच येणाऱ्या अभ्यागांता पेक्षा व्यावसायिक कारणासाठी येणाऱ्यांची गर्दी आता सातारा जिल्हा परिषदेच्या मार्च एंडिंग साठी आहे का कामकाजासाठी आहे? याचा आता शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान, प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या पाठीशी निश्चितच राज्य सरकार आहे. याची ग्वाही वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी दिली आहे. काही सुधारणा करायच्या असतील तर नियमाप्रमाणे कामकाज होणे गरजेचे असल्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागत आहे. याबद्दल कुणाबद्दल आकास नाही असे ही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले .
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
————————————-
फोटो- सातारा जिल्हा परिषदेमधील काही क्षणाचे फोटो (छाया- अजित जगताप सातारा)