फलटण:-दातृत्वाचा खजिना, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील..ताराचंद्र आवळे
प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
दातृत्वाचा खजिना, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील..ताराचंद्र आवळे
सातारा :
रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असून ,रयत उभी करतांना अनेकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना दातृत्वाची साथ दिली. त्यागमूर्ती स्व. सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी सर्वस्वाचा त्याग करून दीडशे तोळे सोन्याचे दागिने रयतेच्या लेकरांसाठी अण्णांच्या स्वाधीन केले, त्यांना दागिन्यांपेक्षा अण्णांचे शैक्षणिक कार्य महत्त्वाचे होते. एवढे समर्पण आज पाहावयास मिळत नाही. त्यांच्या त्यागातून रयत उभी राहिली आहे. हा त्याग अलौकिक आहे,दातृत्वाचा खजिना म्हणजे त्यागमूर्ती लक्ष्मीबाई होय असे रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती तालुका फलटण येथे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात साहित्यिक,समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी मत व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापिका विद्या शिंदे , शीतल बनकर, गोविंद खिलारी उपस्थित होते.सुरुवातीला त्यागमूर्ती स्व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका विद्या शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना सोनवलकर यांनी केले तर आभार प्रदीप माने यांनी मानले.यावेळी गजानन धर्माधिकारी, राजेंद्र घाडगे, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.