क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मावळ तालुक्यात विविध ठिकाणी अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवर धाडी टाकून ३६००० रुपये किंमतीची ८५० लीटर दारु जप्त.

प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकूर मावळ :-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण +-8208717483

मावळ तालुक्यात विविध ठिकाणी अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवर धाडी टाकून ३६००० रुपये किंमतीची ८५० लीटर दारु जप्त.

 

रविवार (दिनांक २१ ) रोजी कामशेत पोलिसांकडून मावळ तालुक्कयातील अनेक ठिकाणी अवैधरीत्या विक्री करणाऱ्या व शरीरास हानिकारक असणार्या गावठी दारू च्या भट्ट्यांवर धाडी टाकल्या यामध्ये कडधे, कोथूर्णे, नाणे, पाथरगाव येथील गावठी दारू भट्टयांवर कामशेत पोलिसांनी छापा मारत ३६००० रूपये किंमतीची ८५० लीटर दारू जप्त केली आहे. आमदार सुनील शेळके यांचा आंदोलनानंतर कामशेत पोलिसांनी धडक कारवाईचा सपाटा लावलेला रविवारी पहायला मिळाले. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५ जनांना अटक केली आहे तर २ आरोपींनी पलायन केले असल्याची माहिती कामशेत पोलिसांनी दिली.
कोथुर्णे येथील कारवाईत महेंद्र सजन बिरावत, आणी सलिप्ता थारा बिरावत यांना तर कडधे येथील कारवाईत परशुराम संतोष राठोड,पार्वती परशुराम राठोड यांना तसेच पाथरगाव येथील कारवाईत रमेश देवीदास नानावत, साहिल रमेश नानावत यांना आणी नाणे येथील कारवाईत सनी बाळू चव्हाण यांना अटक करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही कामशेत पोलिस करत आहेत.
मात्र आमदार सुनिल शेळके यांच्या आंदोलनानंतर मावळ तालुक्यात खरच कायमची दारू बंद होणार का ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button