सातारा जि. प. अभियंता मोदी हटाव, प्रशासन बचाव नाऱ्यासाठी आंदोलन….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा जि. प. अभियंता मोदी हटाव, प्रशासन बचाव नाऱ्यासाठी आंदोलन….
सातारा दि: स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मिनी मंत्रालय आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक विकास कामे होतात. सातारा जिल्हा परिषदेच्या उत्तर विभागातील कार्यकारी अभियंता मोदी यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रामाणिकपणाने काम करणारे काही ठेकेदार वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. दि: २ ऑगस्ट रोजी मोदी हटाव या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे . सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात मर्जीतील ठेकेदारांना वर्क ऑर्डर मिळण्याआधी टक्केवारी घेवून आगाऊ रक्कम देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करावी. अशी मागणी केल्यामुळे सातारा जिल्हा परिषदेमध्ये खळबळ माजली आहे. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी हे विकास कामांना मंजुरी आणण्यासाठी मंत्रालय पातळीवर हेलपाटे मारत असतात. आणि हा निधी आल्यानंतर त्याबाबत ठेकेदार रीतसर निविदा भरतात. पण सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या उत्तर विभागातील कार्यकारी अभियंता मोदी हे मनमानी कारभार करत आहेत. मर्जीतील ठेकेदार म्हणजे सगे सोयरे असे त्यांना वाटू लागले आहे. ही बाब उघडकीस आल्यामुळे ठेकेदारांमध्येही असंतोष पसरला आहे. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी? असा प्रश्न पडलेला आहे. काम पूर्ण झाल्यानंतरही व तपासणी होऊ नये काही कामांची अनेक दिवस बिले काढली जात नाही. संबंधित विभागाचे ठेकेदार हे काम घेण्यापूर्वी ते काम पूर्ण करण्यासाठी पतसंस्था बँक व खाजगी सावकाराकडून पैसे आणतात. त्यांना त्याचे व्याज भरावे लागते. पण, विना भांडवल सध्या जिल्हा परिषदेमध्ये काही आर्थिक व्यवहार होणाऱ्या विभागात कामकाज होत आहे. महिन्याकाठी किमान पाच लाख रुपयांची कलेक्शन होते. असाही आरोप करण्यात आलेला आहे. याबाबत प्रसार माध्यमातून आवाज उठवण्यात आला पण कार्यवाही होऊ शकलेली नाही. ही कार्यवाही होऊ नये म्हणून ठेकेदार लोकप्रतिनिधी हे पुढाकार घेत असल्याचे काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सदर प्रकरण म्हणजे हिमनगाचे टोक असून यामध्ये जर एस.आय.टी.. जर लावली तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. असे स्पष्ट करण्यात आले. ज्या ठेकेदारांवरती कार्यकारी अभियंता मोदी यांनी अन्याय केला असेल त्यांनी श्री रमेश अनिल उबाळे यांच्याशी संपर्क साधावा यामध्ये व्यक्तिगत पातळीवर आरोप करू नये तर सोबत पुरावाही सादर करावा असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या बाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.
———————————————–
फोटो –अभियंता मोदी यांच्यावर कारवाईसाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे निवेदन देताना मान्यवर (छाया-अजित जगताप,सातारा)