ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-सोमवारी खटाव तालुका बंदची हाक मराठा संघटना आक्रमक; निषेध मोर्चाचे आयोजन.

पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्याध्यक्ष:-9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्याध्यक्ष

सोमवारी खटाव तालुका बंदची हाक
मराठा संघटना आक्रमक; निषेध मोर्चाचे आयोजन.

वडूज,दि.2 (प्रतिनिधी)
अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आरक्षणासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या मराठा समाज बांधवांना विनाकारण अमानुषपणे मारहाण करणार्‍या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी खटाव तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी खटाव तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी हुतात्मा स्मारक ते छ. शिवाजी महाराज चौक वडूज या मार्गावर निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात पोलिसांना देण्यात आले आहे.
याबाबत निवेदनात दिलेली माहिती अशी की, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु होतं. आरक्षण थेट जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. मात्र, पोलिसांनी अचानक हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेमुळे मराठा आंदोलक राज्यभर आक्रमक झाले आहेत. त्याचाच भाग म्हणुन खटाव तालुका मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने सोमवारी खटाव तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. वडूज येथील हुतात्मा स्मारक ते छ. शिवाजी महाराज चौक अशी निषेध फेरी काढून छ. शिवाजी महाराज चौक येथे निषेध व्यक्त केला जाणार आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button