क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

मुंबई:-भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, संजय मोने यांचा ‘झिंग चिक झिंग’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’वर!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, संजय मोने यांचा ‘झिंग चिक झिंग’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’वर!

 

मुंबई: देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे ‘झिंग चिक झिंग’ या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट आता ०४ मार्च २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांच्या मनात गंभीर विचारांची दाहकता निर्माण करणार आहे.

एका संवेदनशील शेतकऱ्यावर सावकारी कर्जाचा मोठा डोंगर उभा आहे. परिस्थितीने गांजलेला हा शेतकरी आपला संपूर्ण आत्मविश्वास हरवून बसला असून जगासमोर मान उंच करून चालणं त्याच्यासाठी लज्जास्पद झालं आहे. हा अगतिक शेतकरी कर्जाचा डोंगर फोडून काढेल की त्याखाली दबून मरेल, हे चित्रपटात कळणार आहे. नितीन नंदन यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून चित्रपटात भरत जाधव, माधवी जुवेकर, संजय मोने आणि दिलीप प्रभावळकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत.

“२०१० च्या महाराष्ट्र राज्य पुरस्कारासोबतच आणखी बऱ्याच पुरस्कारांनी पुरस्कृत झालेला चित्रपट अल्ट्रा झकासच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवताना आनंद गगनात न मावणारा आहे. अशाच प्रकारचे अनेक चित्रपट आणून प्रेक्षकांना नेहमी मनोरंजित ठेवण्याचा आमचा सकारात्मक अट्टहास आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

 

प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख : राम कोंडीलकर,

राम पब्लिसिटी, मुंबई

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button