ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाचगणी:-जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांची पाचगणी नगरपालिका विरुद्ध तक्रारी मध्ये दिरंगाई दोन पदाचा कार्यभार जमेना.

प्रतिनिधी आकाश रांजणे सातारा:-9175007074

जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांची पाचगणी नगरपालिका विरुद्ध तक्रारी मध्ये दिरंगाई दोन पदाचा कार्यभार जमेना.
पाचगणी नगरपालकेतील अनियमितता भ्रष्टाचार याबाबत श्री राजेन्द्र गोरखनाथ काळे व श्री आकाश बाजीराव रांजणे यांनी ३६ तक्रारी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या होत्या.त्यामध्ये प्रथमदर्शनी तथ्य असल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार यांनी चौकशी समिती नेमली. त्या मधील २८ तक्रारी या उपविभागीय अधिकारी वाई यांच्याकडे चौकशी साठी देण्यात आल्या होत्या त्याचा अहवाल दिनांक ०९/०८/२०२१ रोजी जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांना प्राप्त झाला यावर गेले एक वर्ष झाले तक्रारदार श्री बापट यांना याबाबत विचारणा करत आहेत.परंतु श्री बापट यांच्याकडे मुळात दोन पदाचे कार्यभार असल्याने त्यांना तब्बल एक वर्षे झाले या गंभीर तक्रारींकडे पाहायला वेळ मिळाला नाही.
तक्रारदार यांनी विचारणा केली असता जिल्हा प्रशासन अधिकारी हे मला दुसरी कामे आहेत अशी उडवा उडविची उत्तरे गेले एक वर्षे झाले देत नाही.शासन परिपत्रक २०२१ नुसार नगरपालिका विरुद्ध असणाऱ्या तक्रारी मध्ये जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी १५ दिवसात निर्णय घेणे बंधनकारक असल्याचे नमूद आहे.परंतु प्रशासकीय असणाऱ्या हितसंबंध यामुळे शासकीय अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.याबाबत लवकरच मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button