आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-साताऱ्यात W-20 अंतर्गत बचतगटातील महिलांसाठी कार्यशाळा व प्रदर्शन दि.१० रोजी.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यात W-20 अंतर्गत बचतगटातील महिलांसाठी कार्यशाळा व प्रदर्शन दि.१० रोजी.
सातारा दि:
भारत सरकारने एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाला शैक्षणिक भागीदार म्हणून W-20 चे आयोजन करण्याची घोषणा केली असून या अनुषंगाने या विद्यापीठाने काही निवडक महाविद्यालयांची निवड W-20 आयोजनासाठी केली आहे. यामध्ये महषी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे एस्. एन्. डी.टी. महिला विद्यापीठ संलग्नीत कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन फॉर विमेन, सातारा येथे W-20 अंतर्गत बचतगटातील ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ.समीक्षा निकम, मधुरा काळे, प्रजुंम आगटे ,डॉ.अंजली साळुंखे, डॉ.धनंजय विधाते यांनी दिली.

ग्रामीण भागातील बचतगटातील महिलांच्या उत्पादनांसाठी डिजीटल स्वरुपाची बाजारपेठ उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. याच धर्तीवर महाविद्यालयाने उद्योजकता या विषयांतर्गत “एक पाऊल सक्षमतेकडे” कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे.

या अनुषंगाने कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचतगटातील महिलांसाठी ग्रामीण पर्यावरण व आधुनिक तंत्रज्ञान या विषयाची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण महिलांना उद्योजकीय प्रेरणा देत सध्याच्या या डिजीटल युगात महिलांना जागतिक बाजारपेठ विषयक ज्ञान देण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. थोडक्यात, या महिलांच्या बचतगटातील उत्पादनांची जाहिरात व विक्री विविध प्रसार माध्यमातून लोकांपर्यंत कशा पध्दतीने पोहोचविता येईल, तसेच त्यांच्या उत्पादनाला विस्तृत बाजारपेठ कशी उपलब्ध होईल याचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. तसेच या कार्यशाळेचा सर्व अहवाल केंद्र शासना कडे पाठविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास सातारा जिल्हा ग्रामीण यंत्रणा प्रकल्पातील सर्वसाधारण १०० महिला व त्यांचे विविध गावातील बचतगट उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेसोबतच बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचतगटातील महिलांचे डिजीटल स्वरुपातील सक्षमीकरण करण्यासाठी टाकलेले हे एक पाऊल आहे.

सदर कार्यक्रमासाठी डॉ. नलिनी पाटील, श्री. संतोष हराळे, प्रोजेक्ट डायरेक्टर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, सातारा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या वेळी आयु्वेदानुसार औषध ॲप उद्घाघाटन केले जाणार आहे. डॉ कल्याणी बारटक्के या समन्वयक आहेत.

—&&&&&–&——————————-&——–
फोटो –

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button