पारनेर:-पत्रकार हे घेणारे नाही , तर देणारे आहेत – डॉ.विश्वासराव आरोटे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार हे घेणारे नाही , तर देणारे आहेत – डॉ.विश्वासराव आरोटे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने निघोज येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा.

पारनेर ( राजकुमार इकडे) समाजासाठी आपल्या लेखनीच्या माध्यमातून अहोरात्र काम करणारे पत्रकार हे समाजाला देणारे असून घेणारे नाहीत , असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ . विश्वासराव आरोटे यांनी केले .
निघोज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मळगंगा ग्रामविकास ट्रस्टच्या सभागृहात पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार गुणगौरव आणि सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला , अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे हे होते. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि माता मळगंगा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ .आरोटे पुढे म्हणाले की, पारनेरच्या पत्रकारितेला विशिष्ट धार आहे , त्यांचे काम ही उत्कृष्ठ आहे , असे गौरवोद्गार काढत , पत्रकारितेचे महत्व विशद करताना ते पुढे म्हणाले की , देशातील न्यायाधीशांवर हल्ले झाले, तेव्हा त्यांना ही पत्रकारांकडेच यावे लागले. पत्रकारांचा मोठेपणा सांगतानाच, चुकीच्या बातम्या देऊ नका, राजकारणी मंडळींच्या आती, जवळ जाऊ नका. कारण ते तुम्हाला ग्राह्य धरतील, त्यामुळे पत्रकारांनी कुणाचेही प्यादे होऊ नका. सोशल मीडिया कितीही पुढे गेली तरी, आज समाजाचा वृत्तपत्र वाचनावरच विश्वास आहे. पारनेरचा पत्रकार देशात कुठेही गेला , तरी त्याला त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, असे संघटन आम्ही केलेले आहे. प्रसंगी सुखदुःखात आम्ही धावून जातो. संवाद यात्रेत नागपूर पासून मुंबई पर्यंत आम्ही सर्व पत्रकारांना एकत्रित केले. २२ मागण्या मंत्रालयात सादर केल्या. सरकारला वज्र मूठ दाखविली. त्यामुळे संघटनेला बळकटी आली. कोरोना काळात दुर्दैवाने निधन झालेल्या पत्रकारांना आम्ही मदत केली. आम्ही देणारे आहोत , घेणारे नाही . पदे येतील , जातील , पण समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या पत्रकारांना संघटना कधीही विसरणार नाही, त्यांना उभारी देण्याचे काम आमची संघटना करते. कुणाचेही जीवन उद्ध्वस्त होणार नाही , याची काळजी पत्रकारांनी घ्यावी . शिक्षकांप्रमाणे पत्रकार कधीही माजी होत नाही. निष्ठेने काम करा, असा महत्वपूर्ण सल्ला ही डॉ . आरोटे यांनी दिला .
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट चे कार्याध्यक्ष वसंतराव कवाद यांनीही पत्रकारांचा गुणगौरव करून, समाजा मध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद पत्रकारांमध्ये आहे. श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे कार्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी पत्रकारांनी केलेली मदत कदापिही विसरता येणार नाही. आज समाजामध्ये अनेक समस्या आहे . समाज जागृतीसाठी पत्रकारांनी विशेष काम करावे. ट्रस्टच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहेच.पत्रकारांनी समाजाला एकत्र आणण्याचे काम करावे , असे ही कवाद म्हणाले . तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर एस कापसे यांनीही पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला . राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांनी पत्रकारितेचे महत्व विशद करत , राज्य पत्रकार संघाच्या कार्याची माहिती अवगत करून दिली .
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन करताना पत्रकार संघाचे महत्त्व विशद करत डॉ . आरोटे यांच्या कार्याचा गौरव केला . यावेळी संघाचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे , ज्येष्ठ पत्रकार दत्ता उनवणे, मुकुंदराव निघोजकर, पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल चे जिल्हा प्रमुख विनोद गायकवाड, संघाचे तालुका सचिव संतोष कोरडे , सहसचिव सोमनाथ गोपाळे , उपाध्यक्ष वसंत रांधवण , श्रीनिवास शिंदे , निघोज शहराध्यक्ष सचिन जाधव, अनिलराव चौधरी , दिपकराव वरखडे , विकास शेंडकर , संपत वैरागर, भगवान मंदिलकर , विजय रासकर, नितीन परंडवाल, सुनिल लोणकर , जयदीप कारखिले , आनंदा भुकन , सागर आतकर , रोहन उनवणे , व श्रीगोंदा येथील पत्रकार मेजर उल्हारे , कु . उल्हारे , बनसोडे , राऊत व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पत्रकारांचा शाल , पेन , डायरी , मिठाई , घडयाळ , गुलाब पुष्प देत सन्मान करण्यात आला . सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर यांनी सर्वांचे आभार मानले. ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
[ चौकट –
याप्रसंगी राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांचा मुलगा चि . स्वामी याने शालेय स्तरावरील परीक्षेत जिल्हा परिषदेच्या पिंपरी जलसेन शाळेत प्रथम क्रमांक मिळविल्याने त्याचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . ]




