ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव( वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय केलेल्या योगदाना बद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गावातील दोन महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला मा.सरपंच सौ.स्मिता भाऊसाहेब चेचरे यांच्या हस्ते सौ.कुसुमताई बाबासाहेब वांगे व सौ.पुष्पा मिलिंद पठारे यांच्या हस्ते सौ.कविता प्रभाकर गायकवाड यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरव आले. .
तसेच गावातील ३५ दिव्यांग ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या ५% दिव्यांग निधीतून आर्थिक सहाय्य करण्यात आले.सदरचे कार्यक्रमात गावातील सर्व प्रमुख सामाजिक कार्यकर्ते गावातील ग्रामस्थ, महिला ग्रामस्थ,ग्रा.पं.सदस्य, पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.