छत्रपती संभाजीनगर:-भिडेवाडा काव्य जागर फुले प्रेमी कवी संमेलन नागसेन वनात संपन्न…
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
भिडेवाडा काव्य जागर फुले प्रेमी कवी संमेलन नागसेन वनात संपन्न…
देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागसेन वनात पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स ॲण्ड आर्ट कॉलेजमध्ये १०० फुले प्रेमी कवीच्या उपस्थितीत कवी संमेलन संपन्न झाले.
प्रसिद्ध गज़लकार ,संविधान दूत , भिडेवाडाकार,फुले प्रेमी कवी विजय वडवेराव आयोजित जिल्हास्तरीय काव्य संमेलनात श्रीरामपूर तालुक्यातील प्रसिद्ध कवी ॲड अण्णासाहेब मोहन यांनी ‘ पत्र लिहिते सावित्रीबाई ‘ही कविता सादर करून माॅ फातिमा शेख , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले यांच्या कार्याचा गौरव काव्यातून केला.बालशाहीर ओवी काळे यांनी रमाई एकपात्री प्रयोग करून सर्वांचेच मन जिंकली, आयोजक विजय वडवेराव यांनी अक्षरशः पायावर माथा टिकून ओवीचे चे विशेष कौतुक केले. सर्वच कवींनी सर्वोत्तम कविता सादर करून फुले विचारांचा जागर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्प माला अर्पण करून सुरू झालेल्या या कवी संमेलनाची सांगता आयोजक फुले प्रेमी कवी विजय वडवेराव यांच्या ‘ सर्वांना पोटभर अन्न मिळून दे ‘ या गीताने झाली. विशेष म्हणजे हे काव्य संमेलन निशुल्कास असताना रुचकर भोजनाची व्यवस्थाही आयोजकांनी केली होती .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेज विद्यार्थींचे सहकारी मिळाले.