ऱाहाता – डोर्हाळे गावात मोकाट गाईंचा शेतकर्यांना मोठा फटका-हाताशी आलेली पिके भुईसपाट.
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव
सदर मोकाट जनावरांचा अद्याप पर्यंत बंदोबस्त केलेला नाही.श्री.बबनराव डांगे यांचे हाताशी आलेले ज्वारीचे पीक गाईंनी नासधूस केले.अनेक शेतकऱ्यांना अशा प्रसंगाना आतापर्यंत सामोरे जावे लागले आहे.लवकरात लवकर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वेळोवेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या नुकसानी जबाबदार कोण?
मोकाट जनावरांपासून झालेल्या नुकसानीस ग्रामपंचायत प्रशासन, तसेच मोकाट जनावरे देखरेख समिती, यांनी यात लक्ष घालून सदर मोकाट जनावरांचा बंदोबस्त तात्काळ करावा किंवा गावच्या वतीने कोंडवाडा तयार करून सदर जनावरे कोंडवाड्यामध्ये बंदिस्त करावी ही विनंती. एकीकडे अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याचे नुकसान व दुसरीकडे मोकाट जनावरे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हातात तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा या अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी हिरावून घेतल्या जात आहे. तरी ग्रामस्थांना विनंती की याचा तातडीने निर्णय घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा ही विनंती अशी मागणी शेतकरी श्री.बबनराव डांगे यांनी केली आहे.