श्रीरामपूर:-नाऊर – निमगाव खैरी रस्त्यावरील खड्डे आठ दिवसात बुजविणार – पटारे
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
नाऊर – निमगाव खैरी रस्त्यावरील खड्डे आठ दिवसात बुजविणार – पटारे

माळेवाडी ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता नव्हे तर खड्डांचा रस्ता म्हणून प्रसिद्ध असलेला नाऊर – निमगाव खैरी या ११ कि.मी. रस्त्यावर वाहनधारकांना ये – जा करणे अवघड बनले आहे या रस्त्यावरून दैनंदिन चालणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने या रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरून देणार असल्याचे आश्वासन पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष दिपक पटारे यांनी दिले . नाऊर येथील आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून निमगाव खैरी ते नाऊर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे या रस्त्यावरून वाहनधारकांना वाहन चालवणे मुस्किल झाले आहे अनेकांना मणक्याचे आजार झाले आहेत या रस्त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून यापूर्वी या रस्त्याचे काम केले होते मात्र त्यानंतर रस्त्याची दुरवस्था झाल्याचे दिपक पटारे यांनी या रस्त्यांला सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरून येऊ त्यानंतर डांबरीकरण किंवा क्राँक्रिटीकरण करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संबधित विभागाच्या उपअभियंता यांना या रस्त्यावरील खड्यांची दुरुस्त करण्याचे काम सांगितले या रस्त्यांवर खड्डे पडल्याने बसेस देखाल बंद झाल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण टांगणीला लागले आहे वैजापुर बस डेपोच्या बसेस देखील या रस्त्यावरून धावणे बंद झाल्या आहेत. वयोवृद्ध व्यक्तींना देखील बसची वाट पाहत तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे प्रसुतीसाठी रुणालयात जाणाऱ्या महिलांना देखील त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नाऊर,जाफराबाद, नायगाव,रामपुर तसेच परिसरातील वाहन चालकांकडून होत आहे.




