फलटण:-सौ.रूपाली सस्ते,मृणाल प्रभुणे व जयश्री तांबे यांचा स्तुत्य उपक्रम.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सौ.रूपाली सस्ते,मृणाल प्रभुणे व जयश्री तांबे यांचा स्तुत्य उपक्रम.
मकर संक्रांत हा सण सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हळदी – कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमी पर्यंत साजरा केला जातो. या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमात अनेक महिला वाण म्हणून वेगवेगळ्या संसार उपयोगी नावीन्यपूर्ण वस्तू भेट देत असतात.
श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे,सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सौ.रूपाली सस्ते, मृणाल प्रभुणे व सौ. जयश्री तांबे या शिक्षिकांनी आज शाळेत, शालेय वेळेपूर्वी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन संसार उपयोगी वस्तू बरोबरच आपल्या शाळेतील सर्व महिला शिक्षकांना प्रेरणादायी पुस्तके वाण म्हणून भेट स्वरूपात दिली. यामध्ये बारामतीचे प्रसिद्ध लेखक व आदर्श शिक्षक श्री. लक्ष्मण जगताप सर यांचे लेट्स अचिव्ह व उपक्रमशील शिक्षिका सौ.मनीषा शिरटावले मॅडम यांचे जीवनरंग ही प्रेरणादायी पुस्तके देण्यात आली. व त्याचबरोबर विद्येची देवता सरस्वती यांचे शुभ चिन्ह ज्यापासून सर्वांना नवचेतना व ऊर्जा मिळते असे भेट देण्यात आले.
आपल्या मुलांच्या भावी जडणघडणीसाठी वाचनाचे महत्त्व खूप आहे. त्यामुळे महिला शिक्षकांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला प्रेरणादायी पुस्तक भेट, सरस्वती चिन्ह, दिल्यामुळे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आहे.