वडूज:-खटाव तालुक्यात शिवसेनेच्या भगव्या वादळात पदाधिकारी निवडीने चैतन्य.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
खटाव तालुक्यात शिवसेनेच्या भगव्या वादळात पदाधिकारी निवडीने चैतन्य.
वडूज दि: हुतात्मा नगरी अशी जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या खटाव तालुक्यात शिवसेनेचा स्वाभिमानी बाणा दाखवला गेला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली भगवे वादळ निर्माण झाले आहे. राजकारण करण्यापेक्षा समाजकारणाचा ध्यास घेणाऱ्या खटाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी निवडी करण्यात आल्या आहेत. यामुळे शिवसेना पक्ष पुन्हा एकदा खटाव तालुक्यात मुसंडी मारत चैतन्य पसरले आहे.
शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, सातारा जिल्हा शिवसेना महिला संघटिका शारदा जाधव, शिवसेना उपजिल्हा संघटिका श्रीमती संगीता पवार, शिवसेना तालुकाप्रमुख महेश गोडसे, शिवसेना शिवसेना महिला संघटिका ऋतिका घोणे , उपतालुकाप्रमुख संजय जगताप सर्व विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख तसेच शिवसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.झाल्या त्यामध्ये माण -खटाव विधानसभा संघटक पदावर चंद्रकांत उर्फ बाळासाहेब जाधव व वडूज शहर प्रमुख किशोर गोडसे यांची निवड करण्यात आली.
शिवसेना माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक कृष्णकांत हेगडे, सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार, तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, महेश गोडसे, समीर जाधव, महिला संघटिका श्रीमती संगीता पवार , शासन आपल्या दारी,,, सातारा जिल्हा निरीक्षक शैलेश साठे व सर्व शिवसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये माण तालुक्यातील दहिवडी या ठिकाणी महत्वपूर्ण भूमिका घेतली.
आगामी माढा लोकसभा निवडणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या आदेशाने शिवसेनेची ताकद निर्माण करून महायुतीचा खासदार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामस्थांशी चर्चा सुरू करण्यात येणार आहे. सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून कार्यरत असलेल्या शिवसेनेच्या सरकारने आतापर्यंत माण खटाव तालुक्यातील दिड लाख विविध लाभार्थीना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी माण- खटाव तालुक्यातील नव पिढीला मार्गदर्शन मिळत आहे.
वडूज , खटाव, पुसेगाव, पुसेसावळी, विसापूर, कातरखटाव, निढळ, दहिवडी, बोराटवाडी ,कुळकजाई, बिदाल, म्हसवड, पळसगाव, एनकुळ, गोपुज, पेडगाव, कुमठे, वारुगड, निमसोड, मायणी, वर्धनगड, पिंगळी, ललगुण, मोळ, डिस्कळ, शिंगणापूर , कलेढोण वरकुठी, मलवडी, गोंदवले आदी गावातील स्वाभिमानी शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली होत असलेल्या विकास कामांबाबत ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे. महायुती म्हणजे समाजकारणात ब्रम्ह- विष्णू- महेश असे हिंदुत्वाचे कवित्व आहे. त्याला उदंड प्रतिसाद लाभत असल्याचे चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
————————————————–
माण खटाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी निवडी करताना मान्यवर मंडळी (छाया- निनाद जगताप, सातारा)