कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-साताऱ्यातील ज्योतिर्मय महोत्सवाने उद्योग व्यवसायाला मिळाली चालना.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यातील ज्योतिर्मय महोत्सवाने उद्योग व्यवसायाला मिळाली चालना.

सातारा दि: सर्वसामान्य कष्टकरी महिला यांना बचत गटाच्या माध्यमातून ज्योतिर्मय महोत्सव संकल्पनेतून बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण झाले असून सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या या ज्योतिर्मय महोत्सवाने महिला सबलीकरणाला चालना मिळाली आहे. तसेच महिला बचत गटाला बाजारपेठ मिळवून दिल्याबद्दल अनेक स्टॉल धारकांनी ज्योतिर्मय महोत्सवाच्या संस्थापक अध्यक्ष सौ सुवर्णाताई पाटील व त्यांच्या टीमला धन्यवाद दिले आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर अत्यंत नेटके नियोजन करून खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील महिला बचत गट व उद्योजकांनी उत्पादन केलेल्या वस्तूची खरेदी व प्रदर्शन करण्याचे भाग्य महिला वर्गासोबतच तरुण व वयोवृद्ध यांना मिळाले. वास्तविक पाहता ग्रामीण भागामध्येही उच्च दर्जाचे उत्पादन होऊन अनेकांचे उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी सहकार्य मिळत आहे .या माध्यमातून फक्त वस्तूंची खरेदी विक्री हाच उद्देश नसून मनोरंजनासोबतच लहान मुलांसाठी खेळणी व मनोरंजनाचा भरपूर प्रमाणात सुविधा उपलब्ध करून लहान बालकांना सुद्धा एक खेळण्याचे दालन उपलब्ध केले आहे.
या महोत्सवामुळे खऱ्या अर्थाने उद्योजक महिलांना सुद्धा हक्काचे व्यासपीठ मिळालेले आहे .या व्यासपीठामुळेच उद्योग व्यवसायात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या गुणवंत व उद्योजक महिलांना महिलांचा गुणगौरव करून त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकली आहे. आज खऱ्या अर्थाने महिलांना मोकळा श्वास घेण्यासाठी ज्योतिर्मय महोत्सव पुढील वर्षी आठवडाभर सुरू व्हावा अशी मागणी अनेक महिलांनी केलेली आहे.
या कार्यक्रमात यशस्वी महिला उद्योजक सौ. चित्रा पवार – पर्स व्यावसायिक, सहानी अन्सारी-स्वेटर विक्रेत्या, पूजा परदेशी
ड्रायफ्रुटस्, कोमल शिंदे- कपडे विक्रेत्या, सामाजिक क्षेत्र-सुनीता पाटणे, अनघा कारखानीस, कोमल साळुंखे, समिंद्रा जाधव यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शाल श्री स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
ज्योतिर्मय महोत्सवास सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख़, पोलीस उपअधीक्षक सूर्यवंशी, सौ. प्रियाताई शिंदे, सौ अरुणाताई बर्गे , अनेक महिला सरपंच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी शासकीय कार्यालयातील अधिकारी वर्ग व सामाजिक कार्यकर्त्या या मान्यवरानी भेट दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्टॉल धारक तसेच सहकार्य करणारी सर्व विभाग प्रमुख शासकीय अधिकारी जिल्हा परिषद पदाधिकारी व ज्योतिर्मय फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. सुवर्णादेवी नरेंद्र पाटील तसेच सौ.निर्मला पाटील,सौ.स्मिता शिंगटे,सौ.रीना भणगे, सौ.राधिका पाटील,,सईदा नदाफ,अरविंद चव्हाण, संगीता घोरपड़े. सौ.राजश्री दोषी,यांनी कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी परिश्रम घेतले.
—————–+—————————
चौकट –सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या ज्योतिर्मय महोत्सव २०२३ या कार्यक्रमाला सुमारे ३५ हजार ग्राहक वर्गाने उपस्थिती दाखवून लाखो रुपयाची आर्थिक उलाढाल केली. खऱ्या अर्थाने दिवाळीनंतर गोरगरीब कष्टकरी बचत गटातील महिलांची दिवाळी साजरी झाल्याच्या आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button