ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मायणी:-आ.गोपीचंद पडळकर हल्ला प्रकरणी मायणी ओबीसी समाज बांधवांचा निषेध मोर्चा.

ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

आ.गोपीचंद पडळकर हल्ला प्रकरणी मायणी ओबीसी समाज बांधवांचा निषेध मोर्चा.

मायणी दि. ११ प्रतिनिधी

विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचेवर इंदापूर येथे काही समाजकंटकांनी चप्पल फेक केली. त्याच्या निषेधार्थ मायणी येथील ओबीसी समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने निषेध मोर्चा काढून पोलिसांना निवेदन देण्यात आले. श्री धनगर विठोबा मंदिर पासून ते मायणीच्या चांदणी चौकापर्यंत सदर मोर्चा काढण्यात आल्यानंतर मोर्चास वडूजचे पोलीस इन्स्पेक्टर महेश इंगळे सामोरे गेले. यावेळी त्यांना ओबीसी समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक करणाऱ्या समाजकंटकाची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासंदर्भात वडूजचे पोलीस इन्स्पेक्टर महेश इंगळे व मायणी पोलीस दुरुक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांचेकडे मागणी करण्यात आली .तसेच यासंदर्भात पोलीस विभागास लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी मायणीतील ओबीसी समाजाचे असंख्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर यांचे वर झालेल्या चप्पल फेक प्रकरणी मायणीतील ओबीसी समाज बांधवांनी पोलीस इन्स्पेक्टर महेश इंगळे व सपोनि अमोल माने यांना निवेदन सादर केले .सदर वेळी नितीन पडळकर, सुरज मडले ,विशाल साळुंखे व समाज बांधव.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button