ताज्या घडामोडी

सातारा:-सामान्यांचे सातारचे राजे.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

सामान्यांचे सातारचे राजे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा या छत्रपतींच्या राजधानीचा वारसा जतन करण्याचे काम खऱ्या अर्थाने सातारच्या गादीने केलेले आहे. छत्रपतींची गादी म्हणून सातारला खूप मोठा मान आहे. आज विजया एकादशी जागतिक मुद्रा दिन निमित्त छत्रपती श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. सामान्यांचे राजे हे त्यांचे विशेषण त्यांच्या कार्याची ओळख सर्वांना करून देत आहे.

राजकारणाच्या चौकटीमध्ये न मावणारे त्यांचे नेतृत्व गुण हे त्यांना सहजासहजी प्राप्त झाले नाही. त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला . आज या सर्वसामान्यांचे राजे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी फलकबाजी, बॅनरबाजी, जाहिरात बाजी होत असली तरी सामान्य माणसांच्या हृदय स्थानावर आपले नाव करणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विशाल हृदयात सामान्य माणसांचा दुवा, आशीर्वाद व जबाबदारीची तिजोरी भरली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सातारचे नाव सात समुद्रा पलीकडे पोहोचले आहे.
एक गोष्ट सत्य आहे की, त्यांच्या प्रत्येक गोष्टी मधून अनेकांचे उपजीविकेचे साधन निर्माण होत असते. काही वेळेला त्यांच्यासोबत आपली छबी उमटवल्याने अनेकांचेही पोट आपोआप भरले जाते. त्या अर्थाने ते सर्वांचेच अन्नदाते आहेत. अन्नदाता सुखी होऊ दे अशी प्रार्थना अनेकजण देत आहेत. त्यामध्येच श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा मोठेपणा आहे. आज सामान्य माणसांना राजेंची भेट घेण्यामध्ये स्वतःच मोठेपण वाटते. कारण या विशाल मनाच्या राजांच्या दरबारी काही मोजकेच मावळे आहेत. जे मावळे सदैव राजांची प्रतिमा उंचावण्यासाठी आपल्या तन-मन-धनाने खऱ्या अर्थाने झटत असतात. यामध्ये नाव घ्यायचे असेल तर खऱ्या अर्थाने सुनील तात्या काटकर, चंद्रकांत पाटील, काका धुमाळ, सुशील मोझर, जितू खालविलकर डॉ. महेश गुरव, मनोज शेंडे, रॉबर्ट, सिताराम शेठ भोसले, रवी साळुंखे, प्रकाश भोसले, सूर्यकांत पडवळ, विजय नायकवडी, सयाजी शिंदे, दत्ता पवार मेढेकर ,राजेंद्रसिंह यादव,, खलीलबाई,, राजू जेधे, अजय धायगुडे, जयवंत पवार, संदीप शिंदे, प्रवीण धस्के, विनीत पाटील, बाळासाहेब ननावरे, राजू गोडसे, संग्रामसिंह बर्गे, प्रमोद इंगळे त्याचबरोबर मान्यवरांची भली मोठी नावे आहेत.
यातील प्रत्येक मावळा हा संघर्ष काळापासून ते आताच्या काळापर्यंत सावली प्रमाणे त्यांच्यासोबत राहिलेले आहेत. हे कधीही विसरून चालणार नाही. सत्ता असली की अनेक जण लाभार्थी म्हणून त्यावर आपले शिक्के उमटवतात. पण ज्यांनी संघर्षाचा काळ अनुभवला. पाहिला आहे. ते आजही छत्रपतींच्या दीर्घायुष्यासाठी मनापासून प्रार्थना करत आहेत.
श्रीमंत छत्रपती .उदयनराजे भोसले यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९६६ रोजी झाला.हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आहेत. ते भारतीय राजकारणी व राज्यसभा नंतर लोकसभा सदस्य तीन वेळा झाले. २०१९ च्या निवडणूकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडुन आले होते. परंतु, सदस्यत्वाचा राजनामा देत ते भारतीय जनता पक्षात गेले. लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना श्रीनिवास पाटील यांनी पराजित केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. यावेळी त्यांच्या प्रचारा निमित त्यांच्या समवेत फिरताना त्यांच्यातील लोकांशी संवाद साधण्याची तसेच लोकांना आपलेसे करण्याची पद्धत खूपच शिकण्यासारखी होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्येच भारदारपणा असल्यामुळे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची छबी म्हणजे अनेकांना सेलिब्रिटी पेक्षाही मोठे सेलिब्रिटी वाटतात. तेवढेच पद्धतीने सामान्य नाही सामान्य व्यक्ती म्हणून ते संवाद साधताना राजेशाहीचा थाटमाट विसरून जातात. त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांच्या यशाचे गमक आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त चांगल्या विचाराने भारावलले
अनेक त्यांचे हितचिंतक व समर्थक विधायक उपक्रम राबवत आहेत. खऱ्या अर्थाने गोरगरिबांना या वाढदिवसानिमित्त चांगली भेट मिळावी. हा त्या पाठीमागे स्वच्छ आणि चांगला विचार आहे. पोकळ जाहिरात बाजी कडे अनेक जण पाठ फिरवतात. पण, विधायक उपक्रमामुळे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस अनेकांना वर्षभर स्मरणात राहील हे मात्र खरे… त्यांच्या वाढदिवसानिमित्त या सामान्य राजे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना मानाचा मुजरा.. .
— अजित जगताप सायगावकर

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

——————————————
फोटो ग्रामीण भागातील सामान्यांना आपले करणारे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले (छाया- प्रमोद इंगळे, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button