वाई:- वित्तीय व वैधानिक साक्षरता काळाची गरज: सीए सुरेश मेहता.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
वाई दि.06
वित्तीय व वैधानिक साक्षरता काळाची गरज: सीए सुरेश मेहता.
किसन वीर महाविद्यालय, वाई वाणिज्य व व्यवस्थापन विभागाअंतर्गत आयोजित व्याख्यानास पुणे येथील ख्यातनाम सीए सुरेश मेहता प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये वित्तीय व वैधानिक साक्षरतेचे महत्व शिक्षक व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी पॅन कार्ड, बँक अकाउंट, गुंतवणूक, एलआयसी पॉलिसी, पीपीएफ तसेच ठेवीदारांची सुरक्षितता या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी वित्तीय क्षेत्रातील संधींविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली आणि वित्तीय क्षेत्रात रोजगाराच्या खूप संधी असलेचे नमूद करून ही संधी घेण्यासाठी अद्यावत ज्ञान प्राप्त करून विद्यार्थ्यांनी सातत्याने कठोर परिश्रम घेतल्यास नक्की यश प्राप्त करता येते, असे प्रतिपादित केले.
सदर व्याख्यानाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रयत्नवादी राहण्याचा गुरुमंत्र दिला तसेच वित्तीय व वैधानिक साक्षरतेमुळे व्यक्तिमत्वामध्ये अमुलाग्र बदल होतो असे प्रतिपादित केले. सदर कार्यक्रमास डॉ. शंतनू अभ्यंकर, दैनिक ऐक्य चे संपादक श्री दत्ता मर्ढेकर, ज्येष्ठ पत्रकार श्री भद्रेश भाटे, श्री दिलीप चव्हाण, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुनील सावंत, डॉ.संग्राम थोरात, डॉ. धनंजय निंबाळकर, डॉ. भीमाशंकर बिराजदार, श्री जितेंद्र चव्हाण, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. संदीप पातुगडे यांनी केले. प्रा. दिपाली चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा.जयवंत पवार यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. प्रा. श्रुती यादव व प्रा. चंद्रिका साबळे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र जमदाडे यांचे बरोबर वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.