वैजापूर:-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
लोणी खुर्द : वैजापूर तालुक्यातील विविध विकास कामांना मंजूरी देऊन कामे सुरु करण्यासाठी निधी देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हंटले आहे की, वैजापूर मधील अनेक कामे पोखरा योजना वंचित असलेले गावे योजनेमध्ये समाविष्ठ करणे. वैजापूर तालुक्यातील मन्याड धरणाची खोलीकरण करून धरणाची उंची वाढविण्यात यावी. लोणी खुर्द येथे कृषी उत्पन्न बाजार समिती चालू करण्यात यावी व तालुक्यातील दुष्काळ नुसार तात्काळ मदत करण्यात
यावी. रोजगार हमी योजना अंतर्गत चालणारे विकास कामांना गती देण्यात यावी. वैजापूर तालुक्यातील शेतकरी पिक विमा तात्काळ देण्यात यावा. वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. २०२२ मधील पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावा, अशा सर्व विविध विकास कामांना मंजूरी देऊन निधी देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातुन केली असुन निवेदनावर तालुकाध्यक्ष दादासाहेब तांबे, चंद्रशेखर साळुंखे, सागर डघळे गौरव गोरखनाथ कडते, कडू बागूल, नारायण कोलते आदींच्या सह्या आहेत.