श्रीरामपूर:-प . पू . प महंत ब्रीजलातदादा पंजाबी यांचे निधन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
प . पू . प महंत ब्रीजलातदादा पंजाबी यांचे निधन.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज ) येथील श्रीकृष्णनगर मधील महानुभाव आश्रम व श्री कृष्ण मंदिराचे प्रमुख परम पूज्य परम महंत श्री बीजलालदादा पंजाबी यांचे व याच्या ७ ६ व्या वर्षी निधन झाले . त्यांचे मूळ नाव बबन डावरे होते . सित्रर तालुक्यातील गोंडेगाव येथे एक वर्षाचे असताना त्यांना संगमनेर जवळ असलेल्या निमज येथे महंत बाबुराजबाबा पंजाबीकडे सुपूर्द करण्यात आले आणि ते ब्रीजलाल पंजाबी झाले महंत बाबुराजदादा सह २२ ऑक्टोबर १९ ६ ८ ला ते श्रीरामपुर आले . श्रीरामपुरच्या रेल्वे ओहर ब्रीजजवळ असलेली जागा गवारे परिवाराने दान दिली त्या जागेत झोपडी बांधली पुढे श्रीकृष्ण मंदीर झाले . महंत ब्रिजभालदादा उर्फ अण्णा पंजाबी यांनी श्रीकृष्ण मंदिरासह आश्रम व विविध वास्तु बांधुन विविध उपक्रम घेतले . या काळात महंत कृष्णराजबाबा यांनी विशेष सेवा केली सध्या त्यांच्या मागे आश्रमात तदस्विनी शकुताई, मनोरमाताई, शैलाताई, स्वातीताई, गोंविदबाबा, विशालबाबा,विद्याताई,चंद्रकलाताईसह दहा महानुभावीय धर्म सेवाकर्म करीत आहेत.