आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई:-मुंबईतील दिव्यांग बांधवांच्या आंदोलनाला उदंड प्रतिसाद..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

मुंबईतील दिव्यांग बांधवांच्या आंदोलनाला उदंड प्रतिसाद..

मुंबई दि: महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नां संदर्भात मुंबई येथील विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये धडक देण्याची भूमिका साताऱ्यातील दिव्यांग बांधवांनी केली. या आंदोलनाला उदंड प्रतिसाद लाभला आहे. दरम्यान, दिव्यांगांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकारी कुलकर्णी यांनी मानवता भावनेतून दिव्यांकांचे लेखी निवेदन स्वीकारून त्यांना दिलासा दिला.
याबाबत माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साताऱ्या राजधानीतून तसेच घटनाकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश झालेल्या सातारा शहरातून दिव्यांग बांधवांनी युगापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केले व आंदोलनाला सुरुवात केली.
या दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध प्रश्नांसाठी अनेकदा मंत्री महोदयांच्या कार्यालय व बंगल्यामध्ये निवेदन दिले. जिल्हा प्रशासनाला आंदोलनाच्या इशारा दिला. परंतु, नेहमीप्रमाणे दिव्यांग बुद्धीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या चाळीस दिव्यांग बांधवांनी आंदोलनाचा निर्धार केला होता.
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई येथे चाळीस दिव्यांग बांधवांनी मिळेल त्या वाहनाने तसेच पायी प्रवास करून मुंबई गाठली.
दिव्यांग बांधवांना राजकीय आरक्षण व नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद सदस्य पद द्यावे. राखीव आमदार निधी खर्च करत नसल्याने आमदारांच्या संपत्तीची चौकशी करावी. संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढवून मिळावे. दिव्यांगांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधीक्षक व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या सेवा पुस्तके मध्ये तशा पद्धतीने नोंद करावी. महत्वाचे म्हणजे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्यामुळे त्यांना पालकमंत्री पदावर मुक्त करून त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सातारा जिल्हा पालक मंत्री करावे. अशी जोरदार मागणी करण्यात आली तसेच घोषणाबाजी झाली.
त्यावेळी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजय पवार, अमोल निकम, शैलेश बोर्डे ,प्रशांत बगले, शांताराम देवरे ,पांडुरंग शेलार, अमोल भातुसे, दशरथ लोखंडे ,बाळासाहेब रेवले दत्ता भुराडे, धर्मेंद्र कांबळे, श्रीमती लतिका जगताप, श्रीमती शालन देशमुख, श्रीमती शोभा मोरे, श्रीमती शालन लोखंडे, विशाल दत्तात्रय कदम, हरिभाऊ साळुंखे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील विविध गावातील दिव्यांग बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. महायुती सरकारच्या अधिकाऱ्यांनी या दिव्यांग बांधवांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. पोलीस यंत्रणेनेही संपूर्ण सहकार्य केल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी आभार मानले. दरम्यान, या आंदोलनाच्या वेळेला सुमारे ४० ते ५० प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु त्यांनी या वृत्ताचे दखल घेतली नाही. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक दबाव असल्याचे निष्पन्न झाल्या असून मुंबईतील प्रसार माध्यमांनाही मोकळीक पणाने काम करण्याची सुबुद्धी सुचावी अशी सर्व दिव्यांग यांनी लालबागच्या राजाकडे प्रार्थना केली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button