वाई:-वेलंग गट नंबर १९१,१९५ /१ या गटात होणाऱ्या बेकायदेशीर कामांची चौकशी करा- रिफाइं (अ ).
संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वाई तालुक्यातील मौजे वेलंग येथील परिसरात मुंबई – पुणे शहरातील धनिकांनी मोठ्या प्रमाणात शेत जमीन खरेदी केलेले असून , वाई महसूल विभागाच्या आशीर्वादाने वेलंग परिसरातील शेत जमिनीवर व डोंगरात झाडांची कत्तल करून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत खोदकाम करण्यात आलेली आहेत.तसेच प्रशासकीय नियमांची पायमल्ली करून बोगस प्रकारे बिनशेती परवानगी प्राप्त करून अनधिकृतपणे बंगल्यांची बांधकामे करण्यात आलेली आहेत. शेतजमीन व डोंगराच्या सपाटीकरण करण्याच्या नावाखाली संबंधित अनेकांनी स्पोट घडवून मोठ्या प्रमाणात जमिनीचे उत्खनन केलेले आहे. या सर्व प्रकारात वाई महसूल विभाग गांधाराची भूमिका घेत अनाधिकृत बेकायदेशीर खोदकाम उत्खरनन व बांधकामांना पूर्णता पाठीशी घालत आहेत. स्थानिकांनी याबाबत महसूल विभागाकडे तक्रार केल्यास तात्पुरत्या स्वरूपात खोटे पंचनामे करून कारवाईचा दिखावा केला जात आहे. याची आपल्या स्तरावर सकल चौकशी होणे गरजेचे आहे.त्या अनुषंगाने आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.