नागपूर येथे 12 जुन रोजी होणार सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा जाहीर सत्कार !!!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
नागपूर येथे 12 जुन रोजी होणार सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा जाहीर सत्कार !!!
पुणे/नागपूर : श्री गुरुदेव सेवामंडळ, नागपूर तर्फे सत्यशोधक समाजाचे प्रेरणास्थान संत कबीर यांच्या 627 व्या जंयती निमिताने श्री .गुरुदेव सेवाश्रम , सुभाष रोड , नागपूर येथे दि.12 जुन 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता पुणे येथील समाजसेवक रघुनाथ ढोक यांचा जाहीर सत्कार आयोजित केलेला आहे. याचे कारण म्हणजे या आधुनिक काळात व विज्ञानयुगात सर्व गोष्टीची सत्यता कळून देखील सर्व जाती धर्मातील लोक व मोठ्या संखेने बहुजन समाज घरातील सर्व कार्यासाठी पंचांग ,मुहुर्थ ,अंधश्रद्धा आणि कर्मकांड पाहून विधी कार्य पार पाडत आहेत. त्यामुळे त्याचे प्रस्थ मोठे निर्माण झालेले आहे. त्यातून लोकांचे मोठे आर्थिक नुकसान व नाहक वेळ वाया जात असताना देखील अनेक अनर्थ घडत आहेत. अशा परीस्थितीत सत्यावर आधारित असलेले व महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीचे कार्य तसेच गृहप्रवेश / वास्तू सोहळे व इतर कार्ये महाराष्ट्र व इतर राज्यात जावून सत्यशोधक ढोक हे गेले अनेक वर्ष मोफत कार्य करीत आहेत. त्यांचेमुळे सत्यशोधक चळवळीस पुन्हा एकदा पुनर्जिवन मिळाले असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आज सत्यशोधक पद्धतीचे कार्य मोठ्या प्रमाणात होणे या काळाची नितांत गरज आहे.
सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र व तेलगांना राज्यात एकूण 53 सत्यशोधक विवाह आणि 14 गृहप्रवेश /वास्तू सोहळे मोफत विधीकर्ते म्हणून अनेक महापुर्षांचे जयंती ,स्मृतिदिनी व महनीय दिनी विधीकार्य पार पाडले असून अनेक प्रथम स्मृतिदिनानिमित नातेवाईक व स्वतःचे आई वडील यांचे प्रबोधनात्मक कृतीशील सामजिक उपक्रम राबवून कार्यक्रम यशस्वी केले आहेत. त्यांनी सर्व जाती धर्माचे पुनर्विवाह मेळावे देखील मोफत भरवून अनेकांचे लग्न जुळविले असून लावले देखील आहेत. ते पुणे येथील पुणे विध्यार्थी गृहाच्या इंजि.कॉलेज मध्ये लिपीक पदाची नोकरी संभाळून सामाजिक ,शैक्षणिक व सहकार क्षेत्रात गेली 34 वर्षे कार्यरत असताना देखील त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी,हिंदी ,इंग्रजी व जर्मन फोर कलर व दिनांची साउली, महात्मा फुले गीत चरित्र व इतर पुस्तके प्रकशित केलेली आहेत.
यावेळी संस्थेचे सर्व कार्यकारिणी मंडळ उपाध्यक्ष सौ.संगीता जावळे ,सहसचिव राजेश कुंभलकर ,कोषाध्यक्ष सात्विक ठवरे , प्रचारप्रमुख सियाराम चावके ,सद्श्य प्रा.रामदास टेकाडे ,प्रभाताई ठवकर व प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्र संत साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पदवाड ,श्री.रुपराव वाघ ,डॉ.गणेश चव्हाण ,श्री.रामराव चोपडे ,श्री.सुरेंद्र बुराडे, श्री.बंडोपंत बोढेकर,श्री.दिलीप सुरकार उपस्थित रहाणार असल्याची माहिती श्री .गुरुदेव सेवामंडळ नागपूरचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अँड.अशोक यावले व सचिव विठ्लराव पुनसे यांनी दिली आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन