कालगाव:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे बालबाजार उत्साहात संपन्न.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे बालबाजार उत्साहात संपन्न.

आज दिनांक 17 जानेवारी शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे विद्यार्थ्यांनी भरवला बाजार . या बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विविध पालेभाज्या,फळभाज्या विकण्यासाठी आणल्या होत्या. या बालबाजाराचे प्रमुख आकर्षण खाऊगल्ली होते. या खाऊ गल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ आणलेले होते. वडापाव, फिंगर चिप्स, आप्पे, पाणी पुरी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी चहा,कॉफीचे स्टॉल ही लावलेले होते.
गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने हा बालबाजार उत्साहात संपन्न झाला.
या बाल बाजारास गावातील सर्व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.
बाल बाजारास सरपंच श्री. सोमनाथ चव्हाण यांनी भेट दिली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील पुजारी सदस्य महेश शिंदे, अधिक भोसले,अमोल चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. त्याचबरोबर गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बाजारास महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसली.
विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव त्याचबरोबर व्यवहार जीवनाशी संबंधित व्यवहार करता यावे या दृष्टीने या बाजाराचे आयोजन करण्यात आलेले होते असे मत मुख्याध्यापक श्री विठ्ठल पवार यांनी मांडले आणि सर्व ग्रामस्थांचे स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतलेला होता. उपशिक्षक श्री तुषार घाडगे यांचे अनमोल सहकार्य लाभले.




