ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

विटा-महाबळेश्वर रस्त्यावरील चोराडे फाटयावर गतिरोधकाचे काम सुरु. चोराडे ग्रामस्थांच्या मागणीला यश : लोकांमध्ये समाधान.

पत्रकार प्रमोद देवाडीगाव ( महाराष्ट्र राज्याध्यक्ष ):-9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार प्रमोद देवाडीगाव ( महाराष्ट्र राज्याध्यक्ष )

विटा-महाबळेश्वर रस्त्यावरील चोराडे फाटयावर गतिरोधकाचे काम सुरु.

चोराडे ग्रामस्थांच्या मागणीला यश : लोकांमध्ये समाधान.

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील चोराडे फाटा येथे चौक रस्ता असून एक रस्ता पाटण- पंढरपूर तर दुसरा रस्ता विटा- महाबळेश्वर कडे जाणारा असल्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक अपघात घडत आहेत, त्यामुळे  आगामी कालावधीत गतिरोधक न बसवल्यास आंदोलन करण्याचा इशारा चोराडे गावचे युवा नेते श्रीकांत पिसाळ यांनी दिल्या नंतर संबंधित बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी गतिरोधक बसविल्यामुळे वाहन चालक व ग्रामस्थ यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे,

या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग अजिबात कमी होत नाही त्यामुळेच या ठिकाणी अनेक वेळा अपघात होताना दिसून येत आहेत.तरी संबंधित विभागाकडे अनेक वेळा तोंडी व लेखी मागणी करूनही गतिरोधक बसवण्यात आले नाहीत, गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग कमी राहत नाही, वेगावर नियंत्रण न राहिल्यामुळे अनेक वेळा समोरासमोर अपघात घडतात, तरी संबंधित बांधकाम विभागाने या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवून लोकांचे जीव वाचवावेत अशा मागणीचे पत्र संबंधित विभागास दिले होते,

तरी संबंधित विभागाने या पत्राची गांभीर्याने दखल घ्यावी,अन्यथा येणाऱ्या काळात चोराडे फाटा येथे घंटा नाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा चोराडे ग्रामस्थांनी दिला होता याची दखल घेत गतिरोधक बसवण्यास सुरुवात केली आहे.यामुळे यापरिसरात होणारे अपघात रोखले जातील. तसेच वाहने कमी वेगाने येतील. गतिरोधकामुळे वाहन धारकांनाही आपल्या वाहनाचा वेग कमी करता येईल. चोराडे ग्रामस्थांच्या मागणीला यश आल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया:

चोराडे फाटा या चौकामधुन वाहने सुसाट जात होती त्यामुळे अपघात जास्त होत होते, तरी या ठिकाणी संबंधित विभागाकडे गतिरोधक बसवण्यात यावा या ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून संबंधित विभागाकडून गतिरोधक बसविल्यामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा येणार आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल.

युवा नेते श्रीकांत पिसाळ
चोराडे,

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button