खटाव:-मराठानगरला शनिवारपासून जोतिर्लिंगाचा यात्रोत्सव.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मराठानगरला शनिवारपासून जोतिर्लिंगाचा यात्रोत्सव.
मायणी :प्रतिनिधी सदर बातमीत
सालाबाद प्रमाणे मौजे मराठानगर,ता.खटाव येथील ग्रामदैवत श्री.जोतिर्लिंग देवाची भव्य यात्रा शनिवार दि.२५ नोहेंबर २०२३ रोजी ते बुधवार दि.२९ नोहेंबर २०२३ अखेर विविध धार्मिक, सांस्कृतिक,व सामाजिक उपक्रमशिल कार्यक्रमांद्वारे होणार आहे.
यात्रेनिमित्त शनिवार दि.२५ रोजी दुपारी ३ ते ५ श्री.सत्य नारायण महापूजा,रात्री ९ वाजता श्री.विष्णूदेव प्रासादिक नाट्यरूपी भारूडी भजन दातेवाडी यांचा भारूडी भजनाचा कार्यक्रम होणार आहे,
रविवार दि.२६ रोजी सकाळी ९ ते १२ महिलांसाठी हळदी – कुंकु कार्यक्रम तसेच मुंबईकर मंडळी यांचेकडून सुवासिनींना भेट वस्तू देण्याचा कार्यक्रम होणार आहे,दुपारी २ ते ५ गजी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे,
जयभवानी गजी मंडळ,चितळी व बिरोबा गजी मंडळ,मोटेवाडी,फटाक्यांच्या आतषबाजीत,सायंकाळी ७ ते ९ छबीना,जोतिर्लिंग देवाची पालखीतून भव्य मिरवणूक निघणार आहे,व रात्री ९ वा.किशोर कुमार कोल्हापूर यांचा आर्केस्ट्राचा बहारदार कार्यक्रम होणार आहे,सोमवार दि.२७ रोजी दुपारी १ ते ५ वाजता यात्रेचा मुख्य रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे.ढोल ताशांच्या गजरात ज्योतिर्लिंग देवाची रथातून संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक निघणार आहे.तर रात्री ९ वा.बारा गावच्या बारा अप्सरा,पुणे यांचा लावण्यांचा बहारदार मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.मंगळवार दि.२८ रोजी सकाळी ९ ते ५ कमल वनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे,बुधवार दि.२९ रोजी सकाळी ९ ते १२ फुलोरा मिटींग (वार्षिक सर्वसाधारण मिटींग) तरी या सर्व कार्यक्रमांचा परिसरातील ग्रामस्थ व सर्व भाविक – भक्तांनी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा.असे आवाहन यात्रा कमेटी,समस्त ग्रामस्थ मंडळ मराठानगर यांचे वतीने करण्यात आले आहे.( सदर बातमी ज्योतिबाचा फोटो वापरावा)