सातारा:-भीमाबाई आंबेडकर पुरस्कार वितरण रविवारी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
भीमाबाई आंबेडकर पुरस्कार वितरण रविवारी.
सातारा –
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षाचा २५ वा महामाता भीमाबाई आंबेडकर पुरस्कार मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या, साहित्यिक छाया कोरेगावकर यांना जेष्ठ साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते येत्या रविवारी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी नगर वाचनालयाच्या पाठक हाॅल मध्ये सकाळी अकरा वाजता प्रदान करण्यात येणारआहे यावेळी ” भारताचा अमृत काल” या विषय सूत्रावरील ३७ व्या व्याख्यानमालेचा प्रारंभ होणार आहे,त्याची तयारी,नियोजन पुर्ण झाले आहे, अशी माहिती अध्यक्ष दिनकर झिंब्रे व उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली.
कार्यक्रम संयोजनाची बैठक संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे यांच्या निवासस्थानी पार पडली. त्यामध्ये कार्यक्रमाचे अंतिम स्वरुप ठरविण्यात आले.महामाता भीमाबाई आंबेडकर पुरस्कार वितरण समारंभा नंतर प्रा. गौतमीपुत्र कांबळे ‘ भारतीय संविधान व धर्मनिरपेक्षता ‘ या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत.
मंगळवारी २८ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे ‘ महात्मा फुले यांच्या स्वप्नातील भारत व सत्यशोधक समाज’ या विषयावर बोलणार आहेत.
बुधवारी २९ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता नामवंत वक्ते,अभ्यासक प्रा. सरफराज अहमद,सोलापूर
‘ अल्पसंख्याकांचे प्रश्न व भारताचे भवितव्य ‘या विषयावर मांडणी करणार आहेत.
गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्त्या ॲड. निशा शिवूरकर, संगमनेर ‘ महिला आरक्षणाचे भवितव्य ‘ यावर बोलणार आहेत.
शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध कायदा तज्ञ ॲड.असीम सरोदे, पुणे ‘ भारतीय संविधान व मानवी हक्क’ या विषयावर बोलणार आहेत.
रविवार ३डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता कायद्याच्या अभ्यासक आय.एल.एस.लॉ कॉलेज पुणे येथील निवृत्त प्राध्यापक जया सागडे ‘समान नागरी कायदा संहिता’ या विषयाची मांडणी करणार आहेत.
मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार प्रशांत रुपवते व डॉ. तुषार जगताप, मुंबई ‘ आरक्षणाचा जटिल प्रश्न’ या विषयाची मांडणी करणार आहेत.
बुधवार दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांस उपस्थित रहावे असे आवाहन संबोधी प्रतिष्ठानचे कार्यवाह ॲड.हौसेराव धुमाळ यांनी केले आहे.
———————————————