मुंबई:-टेंभोडे, नेवाळी, वळवली, कोळवाडी, पडघे, पालेबुद्रुक, वलप आणि हेदूडणे या ८ गावांचा मुंबई ऊर्जा प्रकल्पासोबत चालू असलेल्या संघर्ष यशाच्या निर्णयात्मक टप्यात.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
अनेक दिवसापासुन टेंभोडे, नेवाळी, वळवली, कोळवाडी, पडघे, पालेबुद्रुक, वलप आणि हेदूडणे या ८ गावांचा मुंबई ऊर्जा प्रकल्पासोबत चालू असलेल्या संघर्ष यशाच्या निर्णयात्मक टप्यात.
आज दि. २१/११/२०२३ रोजी मुंबई ऊर्जा प्रकल्पा विरोधात महाविकास आघाडीच्या नेते मा. आमदार श्री. बाळाराम पाटील साहेब, श्री. बबनदादा पाटील ( उबाठा शिवसेनेचे नेते), श्री. जे. एम. म्हात्रे साहेब, श्री. आर. सी. घरत, श्री. सूदाम पाटील, श्री. हेमराज म्हात्रे, श्री. एकनाथ म्हात्रे साहेब, टेंभोडे व वळवली प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीनेचे अध्यक्ष श्री. प्रकाश म्हात्रे साहेब, ॲड. विजय गडगे साहेब, श्री. मारूती चिखलेकर, ॲड. प्रशांत कड़व साहेब व इतर यानी आज महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते श्री. विजय विटेड्डीवार साहेब यांचे सोबत मिटिंग केली असून श्री. विजय विटेड्डीवार साहेब यानी कलेक्टर साहेब आणि मुंबई ऊर्जा विभाग एम. डी. याना कॉल करुन मुख्यमंत्री साहेब यांचे सोबत २-३ दिवसात मिटिंग होईपर्यन्त कामाची गती रोखून ८ गावातील शेतकरी यांच्या जमीनी वाचविणेच्या दृष्टिने डोंगराची जागा ही सदर प्रकल्पासाठी पर्यायी जागा म्हणून वापर करावी अशी चर्चा केलेली असून मा. जिल्हाधिकारी साहेब देखील सकारात्मक आहेत.