श्रीरामपूर:-ऐन दिवाळी मध्ये नाऊर येथील शेतकऱ्याची आत्महत्या :आत्महत्येचे कारणअस्पष्ट.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
ऐन दिवाळी मध्ये नाऊर येथील शेतकऱ्याची आत्महत्या :आत्महत्येचे कारणअस्पष्ट.
(दिपक गायकवाड – RPS स्टार न्यूज नाऊर ): श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल घडली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील नाऊर येथील बाबुराव किसन भवार (वय ५६ ) यांनी आपल्या स्वःमालकीच्या जाफराबाद शिवारातील गट नंबर 44 मधील शेतात असलेल्या छोटेखानी पत्राच्या शेडमध्ये सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या किती वाजता केली याचा तपशील मात्र समजू शकला नाही. मयत बाबुराव भवार यांचे मेव्हणे सोमनाथ उंडे व मुलगा निलेश भवार यांनी त्यांना त्या अवस्थेत पहिल्याने त्यांनी सदर घटनेबाबत गावातील ग्रामस्थांना कळवले असता ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात शेतामध्ये गर्दी केली होती. बाबुराव भवार हे काल सकाळी 11 ते 12 च्या सुमारास जेवण आटपून त्यांच्या शेताकडे गेले होते, त्यानंतरच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांचा मृतदेह श्रीरामपूर येथे शवविच्छेदन करून रात्री उशिरा अंत्यविधी झाला.
यासंदर्भात ग्रामस्थांनी तालुका पोलिसांना कळवले असता त्यांनी घटनेच्या ठिकाणी येण्याची तसदी घेतली नसल्याची चर्चा आहे.