श्रीरामपूर:-दिवाळी खरेदीसाठी श्रीरामपूरचे मार्केट हाऊसफुल्ल . गर्दीने गाठला उच्चांक.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
दिवाळी खरेदीसाठी श्रीरामपूरचे मार्केट हाऊसफुल्ल . गर्दीने गाठला उच्चांक.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपुर शहरांमध्ये दिवाळी या सर्वात मोठ्या सणाच्या खरेदीसाठी विविध भागातुन आलेल्या नागरिकांमुळे श्रीरामपुरचे मार्केट हाउस फुल्ल झाले आहे . सध्या मार्केटमध्ये इतकी गर्दी आहे की मोटरसायकल सुध्दा घालता – काढता येत नाही . फोर व्हीलर गाडी तर मार्केटमध्ये जाणे जवळपास अशक्यप्राय झाले आहे
यंदाच्या मौसमान पावसाळा हा काही विशेष खास राहिला नाही . पावसाने दडी दिल्याने मार्केटवर परिणाम होईल असे वाटत होते . परंतु दिवाळी हा सर्वांत मोठा सण असल्याने प्रत्येक नागरिक काही ना काही खरेदी करतच असतो . दिवाळीचे बारीक – सारीक नागरिक काही ना काही खरेदी करतच . गोडधोड पदार्थ व इतर वस्तुंच्या खरेदी करता श्रीरामपुर शहराच्या मार्केटमध्ये प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे . जाणकरांचे म्हणणे असे आहे की यापूर्वी एवढी गर्दी श्रीरामपुरच्या मार्केटमध्ये कधीच पाहायला मिळाली नाही यंदाची गर्दी हा उच्चांक आहे
हेच आपले श्रीरामपुर जर जिल्हा झाले तर श्रीरामपुरचे मार्केट कोटीच्या उड्डाणे घेईल . सर्व गोर – गरीब . सर्वसामान्य
श्रीरामपूकरांना त्याचा फायदा होईल . त्या स्वप्रपुर्ती करताच श्रीरामपुर जिल्हा कृती समिती व च्या माध्यमातून बिगर राजकीय पद्धतीने श्रीरामपुर जिल्हा मोहिमेची लोक चळवळ चालु आहे