पुसेसावळी:-वाढदिवस साजरा न करण्याचा धैर्यशील कदम यांचा निर्णय.
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर
वाढदिवस साजरा न करण्याचा धैर्यशील कदम यांचा निर्णय.
पुसेसावळी दि.11 (प्रतिनिधी) सातारा जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष व वर्धन कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांचा वाढदिवस रविवार दिनांक 12 रोजी आहे मात्र ते आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत यंदा पाऊस काळ समाधानकारक झाला नाही तसेच पुसेसावळी येथे घडलेली दुर्दैवी घटना संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मराठा बांधवांच्या साखळी उपोषण आंदोलनाच्या पार्शवभूमीवर त्यानी हा निर्णय घेतला आहे दरवर्षी वाढदिवसानिमित्त संपूर्ण सातारा जिल्ह्यातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर कार्यकर्ते वर्धन ॲग्रो परिवारातील सभासद शेतकरी ऊसतोड वाहतूक कंत्राटदार शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असतात परंतु रविवार दि.12 नोव्हेंबर रोजी बाहेरगावी असल्याने सातारा जिल्ह्यातील सर्व भाजपा कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार यांनी शुभेच्छा देण्यास गर्दी करू नये असे आवाहन वर्धन कारखाण्याचे जनसंपर्क अधिकारी तुषार मोहिते यांनी केले दरम्यान दिवाळीच्या पार्शवभूमीवर पोलीस प्रशासन परीश्रम घेत आहे शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून सर्वांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया आपण दिलेल्या शुभेच्छा व आशीर्वाद पुसेसावळी येथील अप्रिय घटना कमी वेळेत आटोक्यात आणणाऱ्या व फक्त पुसेसावळी गावातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्हयात शांतता प्रस्थापित करणाऱ्या पोलीस बांधवाना समर्पित करीत असल्याचे धैर्यशील कदम यांनी सांगितले