गंगापुरःशिरेगाव ते महेबुबखेडा निकृष्ट रस्ता कामाच्या चौकशीसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन.
प्रतिनिधी अमोल चव्हाण :-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
गंगापुरःशिरेगाव ते महेबुबखेडा निकृष्ट रस्ता कामाच्या चौकशीसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन.
दि.2-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कामासंदर्भात वेळोवेळी विवि ध मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही कुठल्याही प्रकारची ठोस भुमिका न घेणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तक्रारदार प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुकासचिव शिवाजी गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद येथे दि.2.2.2023 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन चालू केले आहे.
यापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग गंगापूर येथे थाळीनाद आंदोलन, सतत पाठपुरावा,विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे तीन दिवस आंदोलन करून आमदार मा.श्री.बच्चुभाऊ कडू साहेब याच्या माध्यमातून पाठपुरावा करून महेबुबखेडा ते शंकरपूर या रस्ता दुरूस्ती साठी निधी उपलब्ध करून दिला.महेबुबखेडा ते शंकरपूर रस्ता दुरूस्ती करत असताना रस्ता उखडून ठेवण्यात आलेला आहे.या रस्त्याच काम दोन महिन्यापासून बंद आहे.अभियंता व ठेकेदार संगणमत करून जनतेला वेठीस धरत आहे.
प्रमुख जिल्हा मार्ग-104 शंकरपूर फाटा-सिरेसायगाव ते वजनापूर शिवारापर्यन्त रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी,रामा- 216महेबुबखेडा ते शंकरपूर रस्ता दुरूस्तीच काम त्वरित पूर्ण करण्यात यावे ,राज्य मार्ग-216 सिरेगाव ते महेबुबखेडा ता गंगापूर निकृष्ट रस्ता दुरूस्ती प्रकरणी दी.28-10-2022 च्या गंगापूर आमसभेतील ठरावाप्रमाणे ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे व दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कार्यवाही करावी या प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन चालू आहे. प्रतिनिधी अमोल चव्हाण