पुणे बेंगलोर:- खंबाटकी एस वळणावर विचित्र अपघात; १ ठार ३ जखमी.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे :-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
एस वळणावर विचित्र अपघात; १ ठार ३ जखमी.
प्रतिनिधी
पुणे बेंगलोर महामार्गावर खंबाटकी बोगदा संपल्यानंतर यस वळणाच्या जवळ बेंगरुट वाडी फाट्याजवळ साताऱ्याकडून भरगाव वेगाने आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रक क्रमांक MH १३ QU ९९०० या ट्रकने चारवाहनांना धडक दिल्याची घटना आज दि.२७/९/२०२२ रोजी दुपारी ४ च्या आसपास घडली. या ट्रकने प्रथम पिकअप गाडीला MH ०९ EM ४७९४ धडक दिली.त्यानंतर आयशर टेम्पो MH १४ EU ६८८८ तसेच अल्टो चार चाकी MH १४ X ४०५७ सिमेंट मिक्सर ट्रकने दिलेली धडक एवढी जोरदार होती की या तिन्ही गाड्या पलटी होऊन तो सिमेंट मिक्सर ट्रक शेवटी ट्रॅक्टर ट्रॉली नंबर MH ११ U ३९१६ ला जाऊन धडकला व ट्रक देखील पलटी झाला तसेच ट्रॅक्टरचा पुढचा भाग पूर्ण खराब झालेला दिसून आला. या झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत अशी घटना स्थळावरून माहिती मिळाली या अपघाताची माहिती खंडाळा पोलिसांना समजतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघातातील जखमींना खंडाळा पोलिसांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे व वाहतूक सुरळीत करून दिली आहे.