कुडाळ:-नगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना.
पत्रकार शैलेश मिस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कुडाळ:-नगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना.

कुडाळ:-नगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
नगरपंचायतीचे बॅनर काढण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नगरपंचायतीकडून लावण्यात आलेले बॅनर काढण्याचे काम सुरू होते. बॅनर ट्रॅक्टरमध्ये टाकून आणले जात असताना, अचानक ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटला. अनियंत्रित झालेल्या या ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले गेले. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. दोन्ही जखमींना अधिक उपचारांसाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
2) देवगड:-भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्याकडून मराठवाडा अतिवृष्टी ग्रस्तांसाठी आर्थिक मदत.

देवगड:-भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्याकडून मराठवाडा अतिवृष्टी ग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले होते.
त्याला तत्काळ प्रतिसाद देत भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये अकरा हजार रुपये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीडित शेतकरी व कुटुंबांना मदतीसाठी पाठवले. पीडित शेतकरी कुटुंब हे लवकरात लवकर या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडावेत अशी प्रार्थना देखील केली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहना प्रमाणे प्रत्येक व्यक्तीने सढळ हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करावी असे आवाहनही यावेळी त्यांच्याकडून करण्यात आले.




