ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

राहाता:- – नांदूर्खी बु.गावात डेंगूचा मोठ्या प्रमाणावर प्रसार,ग्रामस्थांचे लेखी निवेदन देत डास प्रतिबंधक फवारणी करण्याची ग्रामपंचायतकडे मागणी.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

राहाता प्रतिनिधी – नांदूर्खी बु.गावात गेल्या काही दिवसापासून डेंगू,सर्दी,खोकला,हिवताप याप्रकारच्या अनेक आजारामुळे धास्तावले आहेत.अनेक घरात आज रुग्ण आढळून येत असून अनेक जण हॉस्पिटलमध्ये डेंगू आजारावर उपचार घेत आहेत.उपचार घेत असताना अनेक पेशंटची परिस्थिती शरीरातील पेशींचे प्रमाण प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे नाजूक बनली आहे.तर अनेक नागरिक लाखो रुपये खर्च करत आहेत.गावात डासांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.यासाठी ग्रामपंचायतने लवकरात लवकर डास प्रतिबंधक फवारणी घरोघरी करावी व सर्दी,खोकला,ताप यासाठी प्रथमोपचार म्हणून गोळ्या व औषध पेशंट असेल त्यांना देण्यात यावे म्हणून नागरीकांनी लेखी निवेदन देत तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.हे निवेदन देतेवेळी श्री.संजय वाकचौरे,श्री.तुषार चौधरी,श्री.वसंत काळे, श्री चंद्रकांत चौधरी, श्री.अमोल चौधरी,श्री.संदीप वाकचौरे,श्री.रोहन चौधरी,श्री.प्रदोष चौधरी,श्री कल्याण चौधरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते…

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button