ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई:-मुंबईतील दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची व समर्थकांची बॅनरबाजी……..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

मुंबईतील दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची व समर्थकांची बॅनरबाजी……..

 

मुंबई दि: मुंबईतील लोकल रेल्वेने सुद्धा शिवाजी पार्क व आजाद मैदान येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला येण्यासाठी आतुर झालेले आहेत. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली ,सोलापूर, कोल्हापूर ,पुणे या ठिकाणाहूनही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबईच्या दिशेने दाखल होत आहेत. मुंबईमध्ये प्रवेश करतात सर्वत्र शिवसेनेची बॅनरबाजी दिसून येत असून सबकुछ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेच त्याचे वर्णन करावे लागेल. ज्या ठिकाणी पाहू त्या ठिकाणी शिवसेनेने मेळाव्याचेच बॅनरबाजी तसेच शिवसैनिकांचा जोश पाहून या मेळाव्याला नेत्यांच्या नावाची घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे.
सातारा जिल्ह्यातील महामार्ग नजीक असलेल्या खंडाळा तालुक्यातील मयूर मंगल कार्यालय या ठिकाणी जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व शिवसैनिकांच्या भोजनाची व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली होती . स्वतः या ठिकाणी शिवसैनिक पदाधिकारी तसेच महिला मंडळ जातीने सर्व शिवसैनिकांना भोजन मिळण्यासाठी परिश्रम घेत होते. विशेष म्हणजे या दसरा मेळाव्याला निघालेल्या कट्टर शिवसैनिक एकमेकांना रस्त्यातून जाताना शुभेच्छा देत होते. त्यामुळे त्यांच्या मनात आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार ,माऊली शेलार, शारदाताई जाधव, विजय पाटील, विकास शिंदे त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी सुद्धा विशेषता रमेश बोराटे, महेश शिर्के, सदाशिव सपकाळ, हणमंत चवरे- पाटील व इतर मान्यवरांनी मेळाव्यासाठी जोरदार तयारी करून शिवाजी पार्क तसेच आजाद मैदानावर सर्व शिवसैनिकांना व्यवस्थित पोहोचवले आहे.
मुंबई कुणाची याचे उत्तर म्हणजे मुंबई आजही शिवसेनेचे असल्याचे दिसून येत आहे. अद्यापही मेळाव्याला सुरुवात झाली नसली तरी सूर्यास्तानंतर खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या वैचारिक तोफा धडधडणार असून या वेळेला सव्वा वर्षात केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा तसेच विरोधी पक्ष म्हणून सक्षमरित्या उद्धव बाळासाहेब ठाकरे काय बोलतील ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजातील काही नेत्यांनी या मेळाव्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असला तरी मोठ्या संख्येने शिवसेनेला मानणारा मराठा वर्ग दोन्ही मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आलेले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे संजय शिरसाठ, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम , शीतल म्हात्रे त्याचबरोबर उद्गव बाळासाहेब ठाकरे , संजय राऊत, नितीन बानुगडे पाटील, विनायक राऊत ,अनिल देसाई, संजय देशमुख आदित्य ठाकरे व सुषमा अंधारे यांची सुद्धा जुगलबंदी पाहण्यास मिळणार आहे. खऱ्या अर्थाने किमान दोन्ही मेळाव्याचा विचार करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचाही कस लागणार आहे. बॅनरबाजीतून व शिवसैनिकांना दिलेली सुविधा हे या मेळाव्याचे खरं वैशिष्ट्य ठरले आहे. स्वतः जातीने डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विचारपीठावर नियोजन करीत आहेत. दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून जुन्या आठवणींनाही उजाळा देण्यात येत आहे भव्य दिव्य विचारपीठ एकच पक्ष एकच विचार एकच मैदान अशी टॅग लाईन लावण्यात येत असून धगधगत्या मशालीचा दगदगचा विचार तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा हिंदुत्व व बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्यत्व ही टॅग लाईन लक्ष वेधून घेत आहे लक्ष वेधून घेत आहे या दोन्ही मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा व बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सत्ताधारी व विरोधक सुद्धा लक्ष ठेवून आहेत.
————————————-
फोटो -सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांची करण्यात आलेली भोजन व्यवस्था व शिवसेनेची गर्दी

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button