आदर्श प्राथमिक शाळेच्या यशाबद्दल पालक उत्साहित.
प्रतिनिधी :- रफिक शेख :-9021132121

आदर्श प्राथमिक शाळेच्या यशाबद्दल पालक उत्साहीत
कराड, दि. 3 (रफिक शेख) : महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघातर्फे राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा सन 2021-22 या शैक्षणिक वर्षांत आदर्श प्राथमिक शाळा कराड मधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केल्याने त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कडून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.
या सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत…..
प्रणिल प्रशांत दुपटे इयत्ता 2री गुण 122 केंद्रात 1ला, यशराज सुनिल हिवरे इयत्ता 2री गुण 120 केंद्रात 2रा, आरव रमेश मोरकळ इयत्ता 2री गुण 108 केंद्रात 3रा, अभिषेक विनायक पवार इयत्ता 3री गुण 116 केंद्रात 1ला, स्वराज महादेव मोटे इयत्ता 3री गुण 102 केंद्रात 2रा, रेहान दस्तगीर मुल्ला इयत्ता 3री गुण 94 केंद्रात 3रा, तनिष्का तानाजी कुंभार इयत्ता 3री गुण 94 केंद्रात 3री, समर्थ शाम ढोणे इयत्ता 4थी गुण 114 केंद्रात 2रा, ऋग्वेद उत्तम हाके इयत्ता 4थी 106 केंद्रात 3रा,समर्थ गणेश हिंगमिरे इयत्ता 4थी 106 केंद्रात 3रा, अशाप्रकारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
या सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराडचे अध्यक्ष मा.श्री जयवंत पांडुरंग पाटील, खजिनदार संजय बदियाणी, श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री साळुंखे सर, आणि पूर्व प्राथमिक शाळेमधील मुख्याध्यापिका सौ देवरुखकर मॅडम यांनी अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षिका सौ ताटेमॅडम, सौ पवार मॅडम, कु. सावंत मॅडम, सौ पाटील मॅडम, कु पाटील मॅडम, सौ साळुंखे मॅडम, कु थोरवडेमॅडम, कु आंबेकरी मॅडम, श्री थोरात सर व मुख्याध्यापिका श्रीमती पोरेमॅडम यांचेही अभिनंदन करुन पुढील वर्षांसाठी शुभेच्छा दिल्या.